शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

डेंगळे पुलास पर्याय

By admin | Updated: October 11, 2016 02:20 IST

डेंगळे पुलाला समांतर असा शहरातील सर्वांत मोठा १६२ मीटर लांब व २४ मीटर रुंद पुलाला सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली

पुणे : डेंगळे पुलाला समांतर असा शहरातील सर्वांत मोठा १६२ मीटर लांब व २४ मीटर रुंद पुलाला सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. या पुलाला छत्रपती शाहू सेतू असे नाव देण्यात आले असून, १४ महिन्यांमध्ये तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या पुलासाठी १९ कोटी ८१ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.शिवाजीनगरकडून जुना बाजार, रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी १९७१ मध्ये डेंगळे पुलाची उभारणी करण्यात आली. मात्र, ५० वर्षांच्या आतच या पुलाची अवस्था खराब झाली आहे. त्यामुळे या पुलावरील जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये या पुलासाठी १२ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार या पुलाला समांतर असा २४ मीटर रुंदीचा पूल बांधण्याच्या प्रस्तावास सोमवारी मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिली. शिवाजीनगर ते जुना बाजार, रेल्वे स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, सेन्ट्रल बिल्डिंग आदी महत्त्वाच्या ठिकाणांना जोडण्याचे काम डेंगळे पूल करतो. या पुलावरील वाहतूक गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली होती. दरम्यान, पुलाची दुरवस्था झाल्याने हा पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पुलामुळे शहरातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले.गेल्या दोन वर्षांपासून डेंगळे पुलाला समांतर पूल बांधण्याची मागणी केली जात होती. तसेच गेल्या २० वर्षांत पालिकेकडून नदीवर कोणत्याही नवीन पुलाची उभारणी करण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये या पुलासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. त्याला सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. पुलासाठी एकूण १९ कोटी ८१ लाख रुपये खर्च येणार आहे, त्यासाठी या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये १२ कोटी रुपये उपलब्ध आहेत. उर्वरित रक्कम पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकातून उपलब्ध करून दिली जाणार आहे अशी माहिती बाळासाहेब बोडके यांनी दिली. (प्रतिनिधी)