शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस भवनाची तोडफोड निंदनीय; पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य : संग्राम थोपटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 22:07 IST

24 तास उलटले असताना मंत्रिपद न मिळालेल्या भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नाराज समर्थकांनी पुण्यातील काँग्रेस भवनाची तोडफोड केली.

पुणे : ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन जेमतेम 24 तास उलटले असताना मंत्रिपद न मिळालेल्या भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नाराज समर्थकांनी पुण्यातील काँग्रेस भवनाची तोडफोड केली. त्यावर आता थोपटे यांनी प्रतिक्रिया दिली असून या प्रकाराची मलाही माहिती नव्हती, पक्षाचा निर्णय मान्य आहे, असे मत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, 'भोर-वेल्हा- मुळशी' असा विस्तीर्ण मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात थोपटे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वीही त्यांच्या वडिलांनी याच भागातून राजकीय ठसा उमटवला आहे. त्यामुळे थोपटे गटाला यावेळी मंत्रिपदाची अपेक्षा होती. ती पूर्ण न झाल्याने संतप्त समर्थकांनी काल भोरमध्ये आंदोलन करत घोषणाबाजी केली होती. काँग्रेसचे भोर-वेल्हा विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे याशिवाय भोर नगरपालिकेच्या सर्व 20 नगरसेवकांसह इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचीही घोषणा केली होती. मात्र इतक्यावरच न थांबता मंगळवारी संध्याकाळी 6च्या सुमारास 40 ते 50 कार्यकर्त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर भागातील काँग्रेस भवनाची तोडफोड केली.

त्यावर आता थोपटे यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, 'काल मुंबईला मुक्कामी होतो, आज सकाळी भोरला आलो. संबंधित प्रकाराची मलाही माहिती नव्हती, मलाही टीव्हीद्वारे संध्याकाळी कळले. हा झालेला प्रकार निंदनीय आणि चुकीचा आहे. कोण कार्यकर्ते आहेत, याची मीही माहिती घेतोय. शहर की ग्रामीण भागातील कार्यकर्ते आहेत की इतर पक्षातील कोणी विनाकारण गालबोट लावत आहेत, याचीही शहानिशा सुरू आहे. मला स्वतःला पक्षश्रेष्ठींनी दिलेला निर्णय मान्यच आहे आणि कायम राहील. माझे कार्यकर्त्यांना आवाहन आहे की त्यांनी शांततेत राहावे, अनुचित प्रकार करू नये' अशी विनंती करतो.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार