शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीची प्रगती की अधोगती ?

By admin | Updated: June 2, 2017 02:52 IST

भ्रष्टाचार, अकार्यक्षमता यामुळे शासकीय यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. माहिती अधिकार कायद्यांतर्गत नागरिकांना माहिती देण्यास

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भ्रष्टाचार, अकार्यक्षमता यामुळे शासकीय यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. माहिती अधिकार कायद्यांतर्गत नागरिकांना माहिती देण्यास यंत्रणा उत्सुक नसते. एखादी योजना प्रस्ताव, समिती स्थापना, मंजुरी या गर्तेत अडकून केवळ कागदावरच राहते. कोणताही भ्रष्टाचार, घोटाळा याबाबत सखोल आणि पारदर्शक चौकशी होत नाही. ही परिस्थिती पाहता लोकशाहीची प्रगती होत आहे की अधोगती, असा सवाल माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांनी उपस्थित केला.संविधानाने आपल्याला दिलेले मूलभूत हक्क व अधिकारांपासून नागरिकांची होत असलेली फारकत या विषयावर आधारलेले अ‍ॅड. दीपक जाधव लिखित ‘वी द पीपल, सब सर्व्हियंट टू पॉवर अँड सिस्टीम’ या पुस्तकाचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिरात खासदार अनू आगा यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. माधव गोडबोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी अ‍ॅड. अश्पाक कादियानी, शिवस्पर्श प्रकाशनचे ज्ञानेश्वर मोळक, अ‍ॅड. शैलजा मोळक आदी मान्यवर उपस्थित होते. शोभा राठोड यांनी सूत्रसंचालन केले.गोडबोले म्हणाले, ‘सरकारी कार्यालयांची दुरवस्था, कर्मचाऱ्यांची उदासीनता याबाबत जैसे थे परिस्थिती पाहायला मिळते. अकार्यक्षमता कमी करण्याच्या दृष्टीने सरकारी यंत्रणेमध्ये आणि शासनामध्ये पारदर्शकता येणे नितांत गरजेचे आहे. कोणताही पक्ष सत्तेवर असला तरी अद्याप शासनाची मानसिकता बदललेली नाही.’ माहिती अधिकार कायद्यांतर्गत सामान्य नागरिकांना व्यवस्थेला पश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार असतो. परंतु, व्यवस्थेकडून समाधानकारक उत्तरे दिली जातात का, हा संशोधनाचा विषय आहे, असेही ते या वेळी म्हणाले.अ‍ॅड. दीपक जाधव यांनी स्वागत केले. अ‍ॅड. अश्पाक कादियानी यांनी प्रास्ताविक केले. शोभा राठोड यांनी सूत्रसंचालन केले. निकिता जाधव यांनी आभार मानले.अनु आगा म्हणाल्या, ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत देश कचरामुक्त करणे महत्त्वाचे आहेच; मात्र, देशातील व्यवस्था स्वच्छ आणि पारदर्शक होणे जास्त गरजेचे आहे. सिग्नल तोडण्यापासून अनधिकृत बांधकामांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर नियम धाब्यावर बसवले जातात, कायद्यांची पायमल्ली होत आहे. कायद्यांचा आदर केल्यास, त्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यास अनेक बेकायदेशीर कृत्यांना आळा बसू शकतो. नागरिकांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत मााहिती देण्यास नकार दिला जातो. माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर राजकीय दबाव आणला जातो. व्यवस्थेबद्दल सामान्यांमध्ये विश्वासार्हता वाढीस लागण्यासाठी आमूलाग्र बदल गरजेचे आहेत.’