शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी

By admin | Updated: December 22, 2016 23:49 IST

नातेपुते, वालचंदनगर, कळस, भिगवण हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्याचे चौपदरीकरण करण्याची गरज आहे. हा

कळस : नातेपुते, वालचंदनगर, कळस, भिगवण हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्याचे चौपदरीकरण करण्याची गरज आहे. हा मार्ग कऱ्हाड ते अहमदनगर असा जोडला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. तसेच पुणे-सोलापूर, पुणे-पंढरपूर या मार्गांना ओलांडून जाणारा मार्ग आहे.कऱ्हाडवरून पुढे यामार्गे कर्जत, अहमदनगरला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. या मार्गावर शिखर शिंगणापूरचा मोठा महादेव, औंध देवस्थान, गोंदवलेमहाराज ,बाबीरबुवा ही तिर्थक्षेत्रे आहेत. तसेच या मार्गावर अनेक साखर कारखाने, विविध शैक्षणिक संस्था असून फळबागा व कृषी उत्पादनांची निर्मिती होणारा हा भाग आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पालखी महामार्गांना जोडणारा हा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्व महामार्ग मंजूर झाले आहे. त्यांची कामेही प्रगतीपथावर आहेत. फक्त या मार्गाचेच चौपदरीकरण होणे बाकी आहे. ही बाब आमदार रामहरी रूपनवर यांनी मागील काही महिन्यात केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या उपेक्षित मार्गाचे लवकरच चौपदरीकरण करण्याची आश्वासन दिले होते. या भागाला न्याय दिला जाईल, असे सांगितले दिले. मात्र त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.(वार्ताहर)