यावेळी किसान सभेचे तालुका कार्यकारिणी सदस्य अनिल सुपे, सामाजिक कार्यकर्त्या शैला आंबवणे, किसान सभेचे सखाराम गारे, पांडुरंग सुपे उपस्थित होते. विद्युत विभागाने संबंधित गावच्या बाजाराच्या दिवशी नागरिकांची वीज बिले कमी करून द्यावीत. विद्युत विभागाने नियमित मीटर रीडिंग घ्यावी व नादुरुस्त मीटर बदलून द्यावेत. आदिवासी बांधवांनी वीज बिले कमी करून घेण्यासाठी अडिवरे, तळेघर, तिरपाड या ठिकाणी उपस्थित करून घ्यावीत. तसेच काही समस्या असल्यास अशोक पेकारी, राजू घोडे, दत्ता गिरंगे, सुभाष भोकटे व रामदास लोहकरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन किसान सभेच्या वतीने करण्यात आले आहे.
विद्युत विभागाचे अधिकारी दर गुरुवारी तळेघर, बुधवारी अडविरे, तिरपाड या बाजाराच्या दिवशी उपस्थित राहून नागरीकांची वाढीव बिले कमी करून देतील, असे लेखी आश्वासन विद्युत विभागाने दिले.
०७ घोडेगाव वीज बिल
आदिवासी भागातील वाढीव वीज बीले कमी करून मिळावी या मागणीचे निवेदन देताना किसान सभेचे कार्यकर्ते.