शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पैशांची मागणी

By admin | Updated: May 30, 2017 01:58 IST

हाताला आलेली गाठ काढण्यासाठी भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या वृद्ध महिलेला शस्त्रक्रिया करण्यासाठी पैशाची मागणी केली

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : हाताला आलेली गाठ काढण्यासाठी भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या वृद्ध महिलेला शस्त्रक्रिया करण्यासाठी पैशाची मागणी केली आणि त्यातील काही रक्कम देण्यातही आल्याचे महिलेच्या नातेवाइकांनी सांगितले. यामुळे या उपजिल्हा रुग्णालयाचा अजब कारभार समोर आला आहे. दलित, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील वृद्ध महिलेला ही वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत हौसाबाई गेनू गाडे (वय ९३, रा. आंबवडे, ता. भोर) यांचे नातू संतोष कांबळे यांनी सांगितले की, गेल्या सोमवारी भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात हौसाबाई गाडे यांच्या हाताला गाठ आल्याने उपचार करण्यासाठी घेऊन आले होते. त्यानंतर केस पेपर काढुन तपासणी केल्यावर भूल देऊन शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यासाठी ३ हजार खर्च येईल असे सांगितले. त्यापैकी दुसऱ्या डॉक्टरांकडे देण्यास डॉ. राजेश मोरे यांनी सांगितल्यानंतर १ हजार रूपये दिले. पट्टी काढायला आल्यावर बाकीचे पैसे देतो असे सांगितले . त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आल्यावर दोन तास थांबल्याने त्याचे कॉट भाडे म्हणून येथील एका कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून २०० रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. राजेश मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, मी कोणत्याही रुग्णाकडे पैसे मागतले नाहीत आणि कोणी मागितले असतील तर त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. रुग्णालय पक्त नावालाचसर्वसामान्य गोरगरीब लोकांना खाजगी दवाखाना परवडत नाही, म्हणून शासनाने भोरला सुमारे दीड कोटी खर्च करुन २००१ साली ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय बांधण्यात आले. मात्र ते फक्त नावालाच असुन रुग्णालयात श्वानदंशाची (कुत्र्याची) लस उपलब्ध नाही. कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. किरकोळ अपघात झालेला रुग्ण आला तरी गोळ्या औषधे इंजेक्शन देऊन त्याला पुण्याला पाठवले जाते. रुग्णांच्या सेवेकडे दुर्लक्ष केले जाते. स्वच्छता वेळेवर होत नाही. सर्वत्र गवत उगवलेले, घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक रुग्णालय परिसरात मुक्कामी राहात नाहीत. वेळेवर हजर नसतात, मनमानी कारभार सुरु आहे.