शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

उमाजी नाईक स्मारकासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी

By admin | Updated: June 28, 2017 03:57 IST

आद्य क्रांतिवीर उमाजीराजे नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक उभे करण्यासाठी शासकीय निधीची भरीव तरतूद करावी, अशी मागणी अखिल

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : आद्य क्रांतिवीर उमाजीराजे नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक उभे करण्यासाठी शासकीय निधीची भरीव तरतूद करावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र बेरड, बेडर रामोशी समाज कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांतीचे पहिले बंड पुकारणारे देशाचे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २२५ वी जयंती ७ सप्टेंबर २०१६ रोजी समाजाच्या वतीने राजभवन भिवडी स्मारक (ता. पुरंदर) येथे साजरी करण्यात आली. परंतु या राष्ट्रपुरु षाचा आणि या समाजाचाही शासनाला अजूनही विसर पडला आहे. आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या महान कार्याबाबत अनेक वर्षे शासन दरबारी वेळोवेळी निवेदन देऊनही दखल घेतली जात नाही. उमाजी नाईक यांची जयंती सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयाने साजरी करावी. त्यांचे छायाचित्र सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात उपलब्ध करून देण्याबाबत परिपत्रक काढावे. त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी शासकीय निधीची भरीव तरतूद करावी. राज्यातील इदाते समिती १९९९ च्या अहवालानुसार रामोशी समाजातील ७५ टक्के लोक भूमिहीन आहेत. त्यामुळे समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, या मागण्या कृती समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.कृती समितीचे जिल्हा संपर्कप्रमुख नानासाहेब मदने, ज्ञानेश्वर भंडलकर, बाळासोा जाधव, विकास भंडलकर, भागवत भंडलकर, सचिन खोमणे, अक्षय भंडलकर, सोमनाथ खोमणे, प्रशांत मदने, संदीप मदने, हनुमंत भंडलकर, मुकेश खोमणे, सचिन मदने, सुनील जाधव, महेश मदने, रवींद्र जाधव, सुनील जाधव, अप्पा भंडलकर आदींनी हे निवेदन दिले आहे.