शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँक उभारण्याची मागणी

By admin | Updated: November 15, 2016 03:10 IST

वेगाने विकसित होत असलेल्या मोशी भागात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा नसल्याने त्या बँका मोठ्या गुंतवणूकदारांना मुकत असून, त्याचा लाभ सहकारी बँका

मोशी : वेगाने विकसित होत असलेल्या मोशी भागात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा नसल्याने त्या बँका मोठ्या गुंतवणूकदारांना मुकत असून, त्याचा लाभ सहकारी बँका व पतसंस्थांना होताना दिसून येत आहे. येथे राष्ट्रीयीकृत बँक उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सहकारी बँकेत नोटा उपलब्ध करून देण्याचा निर्णय उशिराने घेतला गेल्याने तोपर्यंत येथील नागरिकांना नोटा बदलण्यासाठी भोसरी, चाकण, आळंदी येथील बँकांमध्ये रांग लावावी लागली. पतसंस्थेच्या कर्जवाटपावर सरकारचे थेट निर्बंध नसल्याने यात सामान्य गुंतवणूकदाराला आपला पैसा बुडतो की काय याची धास्ती लागून असते. इच्छा असूनही त्याला राष्ट्रीयीकृत बँकेत पैसे गुंतविण्याचा पर्याय मोशी भागात उपलब्ध नाही. यामुळेच मोशी परिसरात केवळ बँकांचे एटीएम न देता राष्ट्रीयीकृत बँकांनी शाखा उभाराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. येथे भाविक व पर्यटकांची मोठी वर्दळ असते. येथे उतरल्यानंतर त्यांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी भोसरी, चाकणच्या बँकेपर्यंत पायपीट करावी लागते. तीस ते ४० हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या मोशी-डुडुळगाव भागात एकही राष्ट्रीयीकृत बँक नाही. यामुळे आतापर्यंत केवळ सहकारीबँक व खासगी पतसंस्थावरच या भागातील नागरिकांची भिस्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे या परिसरात राष्ट्रीयीकृत बँकेची आवश्यकता भासत आहे. (वार्ताहर)