शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

अवैध धंदे बंद करण्याची मागणी

By admin | Updated: January 18, 2016 01:09 IST

वेल्हे तालुक्यात अवैध धंदे फोफावले आहेत. त्यामुळे सामान्य माणसाची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी वेल्हा

मार्गासनी : वेल्हे तालुक्यात अवैध धंदे फोफावले आहेत. त्यामुळे सामान्य माणसाची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी वेल्हा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. तालुक्यातील दारूधंदे व मटका, ताडीविक्री अवैध धंदे त्वरित बंद करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वेल्हे राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे. या संबंधीचे निवेदन वेल्हे पोलिसांना दिले आहे, अशी माहिती तालुका अध्यक्ष तानाजी मांगडे यांनी दिली. ऐतिहासिक असा वेल्हा तालुका हा निसर्गाने नटलेला असून, राजगड व तोरणा यासारखे किल्ले सौंदर्यात मोलाची भर घालत आहेत. या तालुक्यास अवैध धंद्यांनी ग्रासले असून, तरुणाई व्यसनाधिनतेकडे वळली आहे.अवैध धंदे पोलिसांच्या वरदहस्ताने जोमात सुरू असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.अंबवणे, अस्कवडी, विंझर, वेल्हे आदी गावांमधून गावठी दारूसह देशीदारूतसेच ढाबे, ठराविक हॉटेलमध्ये सर्रासपणे विक्री होत आहे. या अवैध दारूधंद्यांकडे पोलीस व उत्पादन शुल्क विभागाकडून सोयीस्कररीत्या दुर्लक्ष झाले आहे. विक्रेते व पोलीस यांच्यामध्ये आर्थिक हितसंबंध असल्याची दबकी चर्चा आहे.वेल्हे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. पठाण व तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना निवेदन दिले. या वेळी युवक अध्यक्ष किरण राऊत, विद्यार्थी अध्यक्ष हनुमंत कार्ले, सर्वेश सुतार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.(वार्ताहर)