शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओचा ‘जिझिया’ रद्द करण्याची मागणी

By admin | Updated: January 14, 2017 02:36 IST

राज्य सरकारने वाहतूक शुल्कामध्ये वाढ करुन तीन महिने उलटण्याच्या आतच, केंद्र सरकारने विविध प्रकारच्या वाहन शुल्कात

पुणे : राज्य सरकारने वाहतूक शुल्कामध्ये वाढ करुन तीन महिने उलटण्याच्या आतच, केंद्र सरकारने विविध प्रकारच्या वाहन शुल्कात दुप्पट ते ३० पट वाढ केली आहे. जिझिया करासाठी ही वाढ तत्काळ रद्द करावी अशी मागणी रिक्षा पंचायतीचे नितीन पवार यांनी केली आहे. केंद्र सरकारने २९ डिसेंबर २०१६ला अधिसूचना काढत सर्व शिकाऊ वाहन परवाना, परवाना चाचणी, व्यवसाय प्रमाणपत्र शुल्क, वाहन नोंदणी शुल्क, नोंदणी पुस्तक फी, वाहन हस्तांतरण, रहिवासी पत्ता बदल, योग्यता प्रमाणपत्र चाचणी शुल्क, विलंब शुल्क अशा विविध कामांच्या शुल्कामधे प्रचंड वाढ केली आहे. त्या पार्श्वभूमीवर रिक्षा पंचायतीने खासदार अनिल शिरोळे, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेत शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या निर्णयामुळे प्रवासी, खासगी व माल वाहतूक करणाऱ्या अशा सर्वच वाहन मालकांना फटका बसणार आहे. या पूर्वी रिक्षाला योग्यता प्रमाणपत्र विलंबासाठी पुण्यात शंभर रुपये शुल्क होते. ते ३ महिन्यांपूर्वी राज्य शासनाने पंधरवड्याला शंभर रुपये केले. त्यात आता केंद्र सरकारने दिवसाला ५० रुपये अशी भर घातली आहे. ही वाढ जिझिया करासारखीच आहे. या वाढीमुळे स्थानिक परिवहन प्राधिकरण, राज्य शासनचा परिवहन विभाग व आता केंद्र शासनाचा परिवहन विभाग असा तिहेरी कर भरावा लागणार आहे. (प्रतिनिधी)