शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भोरला टँकरची मागणी वाढली

By admin | Updated: March 25, 2017 03:41 IST

तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. ४ गावे व ४ वाड्यांनी टँकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे सादर केले

भोर : तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. ४ गावे व ४ वाड्यांनी टँकर मागणीचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे सादर केले आहेत. भविष्यात त्यात वाढ होणार आहे. त्यामुळे सदर गावांना लवकरात लवकर टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे.गेल्या वर्षी टंचाईग्रस्त ४ गावे आणि १६ वाड्यावस्त्यांना ६ खासगी टँकरने २७ एप्रिलपासून पाणी सुरू करण्यात आले होते. ते ३० जूनला बंद करण्यात आले. दोन महिने टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. या वर्षी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने टंचाई लवकर जाणवू लागली आहे. पंचायत समितीकडे भाटघर धरणभागातील भुतोंडे, डेरे, खिळदेववाडी, गृहिणी, धनगरवस्ती, खुलशी तर नीरा-देवघर धरण भागातील शिरवली हि.मा., म्हसर बुद्रुकची धनगरवस्ती या चार गावांनी व ४ वाड्यावस्त्यांनी टँकरचा प्रस्ताव दिला आहे. पंचायत समितीकडून तो तहसीलदारांकडे पाठवून प्रातांधिकाऱ्यांमार्फत मंजूर होईल.या गावातील टंचाईची उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करूनच हे प्रस्ताव मंजूर करून त्यानंतर टँकर सुरू करण्याची पद्धत आहे. मात्र, या सर्व प्रक्रिया पूर्ण कधी होणार? टँकर कधी सुरू होणार? त्याला वेळ लागणार असल्याने टंचाई वाढतच जाणार आहे. आणखी गावे टँकरची मागणी करीत राहणार. त्यामुळे लवकरात लवकर टँकर सुरू करावेत, अशी मागणी या ग्रमास्थांनी केली आहे. (वार्ताहर)