शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोषींवर कारवाईची मागणी

By admin | Updated: May 26, 2017 06:18 IST

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पेपरफुटीप्रकरणी विविध विद्यार्थी संघटनांनी गुरुवारी दोषींवर कारवाई करण्याची मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पेपरफुटीप्रकरणी विविध विद्यार्थी संघटनांनी गुरुवारी दोषींवर कारवाई करण्याची मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) परीक्षा विभागाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून विद्यापीठात आंदोलन केले.अभियांत्रिकीच्या काही विषयांच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका तासभर आधी विद्यार्थ्यांना मोबाईलवर मिळाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोथरूड व वाघोली पोलीस ठाण्यांत संबंधित विद्यार्थ्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला. या पेपरफुटी प्रकरणाच्या निषेध करण्यासाठी ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी परीक्षा नियंत्रक कार्यालय ते कुलगुरू कार्यालयापर्यंत परीक्षा विभागाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून आंदोलन केले. भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंची भेट घेऊन दोषांवर कारवाईची मागणी केली. योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. या वेळी सेनेचे शहर संघटक अतुल दिघे, शिवाजीनगर विभाग संघटक किरण पाटील, उपसंघटक प्रसाद बागाव, हृषीकेश जाधव, प्रथमेश पवार आदी उपस्थित होते.