शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

दिल्ली विद्यापीठात मराठी हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:19 IST

एकीकडे यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना, दिल्ली विद्यापीठातील ४ प्रमुख विषयांमधून मराठी भाषा वगळण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्व स्तरांतून निषेध नोंदवला जात आहे.

पुणे : एकीकडे यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना, दिल्ली विद्यापीठातील ४ प्रमुख विषयांमधून मराठी भाषा वगळण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्व स्तरांतून निषेध नोंदवला जात आहे. हा निर्णय तत्काळ रद्द करून विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या अध्ययनाची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू आणि महाराष्ट्रातील ४८ खासदारांना साहित्य परिषदेने या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पत्र पाठवले आहे.दिल्ली विद्यापीठाने त्यांच्या ४ प्रमुख विषयांतून मराठी भाषा वगळण्याच्या घेतलेला निर्णय घटनाबाह्य, दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे. हा विषय घेतल्यास एकूण गुणांमधून २५ टक्के गुणांची कपात करण्याचा घेतलेला अविचारी निर्णय मराठी भाषकांसाठी क्लेशदायक आहे. त्यामुळे हा निर्णय तत्काळ रद्द करून तेथे मराठी भाषेच्या अध्ययनाची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेने केली आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.‘विविधतेत एकता’ हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यामुळेच देशाचा जगभरात नावलौकिक आहे. तो कायम ठेवण्यासाठी राजधानीच्या शहरात भारतातील सर्व भाषांचाआदर करणे आणि त्यांना समानन्याय देणे, हे केंद्र शासनाचे आद्य कर्तव्य आहे.मराठी, मल्याळम्, कन्नड, तमीळ, उडिया, नेपाळी या भाषा विद्यापीठ अभ्यासक्रमातून हद्दपार करणे आणि पंजाबी, हिंदी, उर्दू, अरेबिक, बंगाली यांचा समावेश कायम ठेवणे ही बाब भाषिक सौहार्दतेला बाधा आणणारी आहे. याचा केंद्र शासनाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. तमाम मराठी भाषकांच्या भावना लक्षात घेऊन या प्रश्नी संबंधितांनी तत्काळ लक्ष घालावे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.