शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दुबार मतदारांची नावे होणार डिलिट

By admin | Updated: April 24, 2015 03:28 IST

जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने वेळोवेळी नोटीस देऊन देखील लाखो मतदारांनी आपले दुबार नाव, मयत झालेल्या व्यक्तींचे नाव कमी करण्यासाठी अर्ज केले नाहीत

पुणे: जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने वेळोवेळी नोटीस देऊन देखील लाखो मतदारांनी आपले दुबार नाव, मयत झालेल्या व्यक्तींचे नाव कमी करण्यासाठी अर्ज केले नाहीत. यामुळे दुबार मतदारांवर कडक कारवाई करून अशी नावे त्वरित डिलिट करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ८६ हजार दुबार मतदारांची नावे यादीतून लवकरच डिलिट करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिवडणुक निर्णय अधिकारी समिक्षा चंद्राकार यांनी सांगितले.जिल्हा निवडणूक कार्यालयांच्या वतीने जिल्ह्यातील मयत, दुबार आणि स्थलांतरित मतदारांची स्वतंत्र यादी तयार केली आहे. अशा मतदारांची यादी सर्व विधानसभा मतदार संघात संबंधित मतदार नोंदणी अधिका-यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मतदार यादीत दोन ठिकाणी नाव असलेल्या मतदारांना नोटीसा पाठवून त्यांना नक्की कोणत्या मतदार संघात नाव कायम ठेवायचे याची विचारणा केली आहे. एकाच व्यक्तींचे दोन मतदार संघात नाव असणे कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे या नोटीसीला उत्तर न देणा-या मतदारांवर कारवाई करुन त्यांची नावे अखेर डिलिट करण्यात येणार आहे.जिल्ह्यात २१ विधानसभा मतदार संघात ८ हजार ९४७ मतदार स्थलांतरीत, १२ हजार ८४५ मतदार मयत आणि तब्बल ४ लाख ६४ हजार २३८ मतदार दुबार आहेत. या मतदारांमुळे जिल्ह्याची मतदार यादी मोठ्या प्रमाणात फुगली आहे. त्यामुळे ही नावे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)