शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

भीमा नदीवर ढापे बसविण्यास विलंब

By admin | Updated: February 21, 2017 01:51 IST

देऊळगावराजे (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या कोल्हापूर बंधाऱ्यावरील ढापे जलसंपदा विभागाने अद्याप बसवले नाही

देऊळगावराजे : देऊळगावराजे (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या कोल्हापूर बंधाऱ्यावरील ढापे जलसंपदा विभागाने अद्याप बसवले नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईला दौंडच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.या भागातील शेतकरी नेहमीच दुहेरी संकटात सापडला आहे. गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात भीमा नदीचे पात्र कोरडे पडले होते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी भामा-आसखेडचे पाणी सोडण्यात आले. परंतु ते पाणी दौड तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतातील गहू, हरभरा, ऊस यांसारखी उभी पिके जळून चालली. या वर्षी पाणी असूनही ढापे न टाकल्याने देऊळगावराजेच्या बंधाऱ्यात दोन अडीच फूट पाणी शिल्लक आहे.पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. येथील शेतकरी सांगतात, फेबुवारी महिना संपत आला तरीसुद्धा अद्याप ढापे टाकले नाही. गेल्या वर्षी पावसाळ्यात काही ढापे वाहून गेले आहे आणि त्यातील काही ढाप्यांचे पत्रे निकामी झाले आहेत. त्यामुळे जरी ढापे टाकले तरी त्या ढाप्यातून पाणीगळती चालू राहील. परिणामी पाण्याच्या संदर्भात गेले दिवस पुढे येतील काय, अशी भीती येथील शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. तेव्हा संबंधितांनी याकडे लक्ष देऊन वेळीच नवीन ढापे टाकावेत, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.