शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
3
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
4
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
5
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
6
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
7
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
8
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
9
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
10
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
11
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
12
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
13
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
14
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
15
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
16
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
17
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
18
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
19
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
20
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    

युतीच्या चर्चेत उमेदवार यादीला विलंब

By admin | Updated: January 15, 2017 05:51 IST

महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराला कमी म्हणजे अवघे १२ दिवस मिळणार असल्याने उमेदवार यादी लवकर जाहीर करावी, अशीच सर्वपक्षीय इच्छुकांची मागणी आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराला कमी म्हणजे अवघे १२ दिवस मिळणार असल्याने उमेदवार यादी लवकर जाहीर करावी, अशीच सर्वपक्षीय इच्छुकांची मागणी आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी व भारतीय जनता पार्टी-शिवसेना या प्रमुख पक्षांच्या प्रदेश नेत्यांकडून आघाडी किंवा युतीचा निर्णय होत नसल्याने त्यांचे स्थानिक नेते यादी जाहीर करण्यास विलंब करीत आहेत.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी व्हावी, यावरून फक्त चर्चा सुरू आहे; नेत्यांमध्ये मात्र अद्याप एकही बैठक झालेली नाही. तीच स्थिती भाजपा-शिवसेनेची आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला आहे; पण सेनेकडून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यांचे स्थानिक नेते पक्षप्रमुख काय निर्णय देतात, याकडे डोळे लावून बसले आहेत. भाजपाशी युती केलेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) यांनीही आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण केल्या आहेत; मात्र भाजपाकडून त्यांना कोणत्या जागा दिल्या जाणार, याचा निर्णय होत नसल्याने त्यांनाही त्यांची नावे जाहीर करण्यास मर्यादा आल्या आहेत. मनसेने त्यांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा अहवाल पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे दिला असून, त्यांच्याकडून येत्या दोन ते तीन दिवसांत उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. नव्या रचनेतील ४१ प्रभागांमध्ये एकूण १६२ जागा आहेत. प्रमुख राजकीय पक्षांकडे त्यापेक्षा कितीतरी जास्त उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. सर्वाधिक म्हणजे ८५१ इच्छुकांनी भाजपाकडे, तर त्याखालोखाल राष्ट्रवादीकडे ५७५ जणांनी इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखती दिल्या आहेत. काँग्रेसकडे ५३५ जणांनी व सेनेकडे ६८७ जणांनी मुलाखती दिल्या आहेत. मनसेकडेही ५२५ जण इच्छुक आहेत. यात एकाच प्रभागातून अनेक जणांनी मुलाखती दिल्यात, तर काही पक्षांना एखाद्या प्रभागात उमेदवारच मिळालेला नाही. विशेषत:, महिला उमेदवाराबाबत काही पक्षांची काही प्रभागात अडचण झाली आहे. सर्वच पक्षांचे मुलाखतीचे अहवाल तयार झाले असून, ते पक्षाच्या उमेदवार निवड समितीकडे देण्यात आले आहेत.विद्यमानांना प्राधान्य : पक्षांतर केलेल्यांचा विचारचार सदस्यांचा एक प्रभाग, अशी रचना असल्यामुळे बहुतेक राजकीय पक्षांकडून अपवाद वगळता विद्यमान नगरसेवकांना प्राधान्य मिळण्याची चिन्हे आहेत. पक्षांतर केलेल्या नगरसेवकांचाही त्यांत समावेश आहे. त्यांच्या प्रभागातील अन्य तीन उमेदवारही त्यांच्या पसंतीने देण्यात येतील, असे दिसते. येत्या दोन ते तीन दिवसांत प्रमुख राजकीय पक्षांकडून पहिली यादी म्हणून ही नावे जाहीर करण्यात येतील. त्यानंतर आघाडी किंवा युती होते आहे अथवा नाही, हे लक्षात घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी व सेना-भाजपा यांच्याकडून दुसरी यादी जाहीर केली जाईल.