शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दूधभेसळीचे खटले प्रलंबित

By admin | Updated: December 10, 2015 01:16 IST

राज्यात सन २००१पासून हजारोंच्या संख्येने दूधभेसळीसह जीवनावश्यक कायद्यानुसार दाखल केलेले खटले अद्यापही प्रलंबित आहे.

कोरेगाव भीमा : राज्यात सन २००१पासून हजारोंच्या संख्येने दूधभेसळीसह जीवनावश्यक कायद्यानुसार दाखल केलेले खटले अद्यापही प्रलंबित आहे. सर्व जिल्हा न्यायालयांना महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने अधिसूचना जारी करूनही जिल्हा न्यायालयांकडून खटल्यांचा निपटारा करण्याबाबत अद्यापही अंमलबजावणी झालेली नसल्याने प्रस्थापित दूधभेसळ माफिया मोकाट असल्याचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर यांनी सांगितले. पुणे जिल्हा न्यायालयात दूधभेसळीसह जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत ५०० पेक्षा जास्त खटले दाखल करण्यात आले आहेत. या खटल्यांवर सन २००१पासून अद्याप सुनावणीसुद्धा झालेली नाही. पुणे जिल्ह्यात ५०० पेक्षा जास्त खटले दाखल असल्याने, राज्यात हजारोंच्या संख्येने खटले असल्याने राज्यातील दूधभेसळमाफिया मोकाट आहेत. प्रलंबित खटले सुनावणी होऊन दोषींना शिक्षा झाल्यास दूधभेसळीसह अन्नपदार्थांतील भेसळ रोखता येईल. यासंदर्भात ग्राहक पंचायतीचे रमेश टाकळकर यांनी प्रलंबित खटल्यांची यादी जोडून उच्च न्यायालय आणि न्याय व विधी विभाग मुंबई यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची मुंबई उच्च न्यायालय, विधी व न्याय विभागाने दखल घेतल्याबाबतचे कोणतेही लेखी उत्तर न दिल्याने ग्राहक संरक्षण मंत्रालय, मुंबई यांना १३ सप्टेंबर २०१५ रोजी कळविण्यात आले. यानंतर ग्राहक संरक्षक विभागाने न्याय व विधी विभागाला पाठविलेल्या शिफारशीनुसार सदर तक्रारींवर कार्यवाही झाल्याचे अधिसूचनेची प्रत तक्रारदारांना देण्यात आली. यानुसार जुन्या अन्न व जीवनावश्यक वस्तू कायद्यातील सर्व खटले २३ एप्रिल २०१५ पासून एका वर्षाच्या आत निकाली काढण्याबाबत मुंबई उच्च न्यायालय व राज्यातील जिल्हा न्यायालयांना अधिसूचित करण्यात आले आहे. तथापि, या आदेशानुसारही जिल्हा न्यायालयाने हे खटले प्रलंबित ठेवल्याने अधिसूचनेकडे जिल्हा न्यायालयाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. त्यामुळे न्यायालयच राज्यातील प्रस्थापित पक्षांच्या या दूधभेसळ माफियांना पाठीशी घालत असल्याचे रमेश टाकळकर यांनी सांगितले. (वार्ताहर)