शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

देहूरोडला ७२, खडकीत ६८ टक्के मतदान

By admin | Updated: January 12, 2015 02:25 IST

देहूरोड कॅन्टोन्मेट बोर्डाच्या निवडणुकीसाठी सरासरी ७२.२२ टक्के मतदान झाले. ३७ हजार २३२ मतदारांपैकी २६ हजार ८८९ मतदारांनी बजावला हक्क बजावला.

पिंपरी/देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेट बोर्डाच्या निवडणुकीसाठी सरासरी ७२.२२ टक्के मतदान झाले. ३७ हजार २३२ मतदारांपैकी २६ हजार ८८९ मतदारांनी बजावला हक्क बजावला. मतदानांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. देहूरोडला एकूण ४५ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने मतदान शांततेत पार पडले. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह होता. वॉर्ड क्रमांक एकमध्ये सर्वाधिक ८५.५३ टक्के तर वार्ड क्रमांक सातमध्ये सर्वात कमी ६२.१५ मतदान झाले. तसेच सात वॉर्डांतील एकूण १९ हजार ३४६ पुरुष मतदारांपैकी १३ हजार ८४६ तर १७ हजार ८८६ महिला मतदारांपैकी १३ हजार ०४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सायंकाळी सहाला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कॅन्टोन्मेंट बार्डाच्या कार्यालयात मतदान यंत्रे ठेवण्यात आली. याठिकाणी पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे. आज (सोमवार) सकाळी आठला कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयाशेजारी मोजणी होणार आहे. यासाठी मंडप उभारण्यात आला आहे. दहापर्यंत सर्व सात वॉर्डांचे निकाल जाहीर होतील. पिंपरी : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत आठ वॉर्डांत एकूण ३० हजार २० मतदारांनी मतदान केले. किरकोळ वाद वगळता शांततापूर्ण वातावरणात मतदान झाले. एकूण ६८.१० टक्के मतदान झाले. गेल्या वेळेच्या तुलनेत केवळ ३ टक्क्यांची वाढ झाली. निवडणुकीमुळे खडकी, रेंजहिल्स, साप्रस आणि संगमवाडी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. थंडीमुळे नागरिक घराबाहेर न पडल्याने सकाळच्या वेळी मतदान केंद्र ओस पडली होती. मात्र, अपवाद वॉर्ड क्रमांक दोनमधील लालबहादूर शास्त्री स्कूलमधील केंद्रातील होता. तेथे अनेकांनी उत्स्फूर्तपणे सकाळीच गठ्ठा मतदान केले. सकाळच्या पहिल्या सत्रात केवळ ७ टक्के मतदान झाले. थंडी ओसरल्यानंतर सकाळी ११ नंतर गर्दी होऊ लागली. काही वेळातच रांग लागल्याचे चित्र अनेक केंद्रांवर पहावयास मिळाले. मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडल्याने केंद्रावरील वर्गात लांबपर्यत रांगा लागल्या होत्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने परिसरात निवडणुकीचे चित्र दिसत होते. तोपर्यंत एकूण १९ टक्के मतदान झाले. उत्साही कार्यकर्ते मतदारांना घरातून बाहेर काढत होते. अपंग आणि वयोवृद्धांसाठी वाहनांची सोय केली होती. त्यांना मतदान करण्यासाठी केंद्रावर आणण्यास प्राधान्य दिले जात होते. दुपारी तीनपर्यन्त ५० टक्के मतदान झाले. अंतिम टप्प्यातही मतदार केंद्राकडे मोठ्या संख्येने जात होते. उन्हामध्येही ही गर्दी कमी झाली नाही. सायंकाळी ५ पर्यंत ६४ टक्के मतदान झाले होते. सहापर्यंत एकूण ६८ टक्के मतदान झाले. एकूण ३० हजार २० जणांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या वेळेच्या २००८ च्या मतदानाच्या तुलनेत वॉर्ड १ व २ वगळता सर्व वॉर्डांत मतदानाचा टक्का वाढला. या दोन्ही वॉर्डांत अनुक्रमे ६ व ७ टक्क्यांनी मतदान घटले आहे. (प्रतिनिधी)पिंपरी/किवळे : देहूरोड कॅन्टोन्मेटच्या रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी ७२.२२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वॉर्ड क्रमांक एकमध्ये सर्वाधिक ८५.५३ टक्के, तर वार्ड क्रमांक सातमध्ये सर्वांत कमी ६२.१५ टक्के मतदान झाले. मतदारयादीत नाव असणाऱ्या एकूण ३७ हजार २३२ मतदारांपैकी २६ हजार ८८९ मतदारांनी हक्क बजावला. एकूण ४५ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. देहूरोड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने मतदान शांततेत पार पडले. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. कडाक्याची थंडी असतानाही सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. चिंचोली, किन्हई, शेलारवाडी या ग्रामीण भागात सकाळी सातपासूनच मतदानाचा वेग चांगला होता. दुपारी एकनंतर मतदानाचा वेग काहीसा मंदावला होता. तर शहरी भागात मतदानाचा वेग सकाळी नऊ नंतर व दुपारी चारनंतर वाढल्याचे चित्र दिसत होते.वॉर्ड क्रमांक एकमधील सहा मतदान केंद्रांवर सरासरी ८५.०७ टक्के, वॉर्ड क्रमांक दोनमधील सहा मतदान केंद्रांवर सरासरी ७२.४४ टक्के, वॉर्ड क्रमांक तीनमधील सहा मतदान केंद्रांवर सरासरी ७१. २४, वॉर्ड क्रमांक चारमधील सात मतदान केंद्रांवर सरासरी ६५.८६ टक्के, वॉर्ड क्रमांक पाचमधील सहा केंद्रांवर सरासरी ७३. ७२ टक्के, वॉर्ड क्रमांक सहामधील सात केंद्रांवर सरासरी ७९.०३ टक्के मतदान झाले. वॉर्ड क्रमांक एकमधील मतदान केंद्र क्रमांक तीनमध्ये सर्वांत अधिक ९३.८७ टक्के तर वार्ड क्रमांक सातमधील मतदान केंद्र क्रमांक ४४ येथील मतदान केंद्रावर सर्वांत कमी ३२.०८ टक्के मतदान झाले. जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील एकूण ६ पोलीस निरीक्षक, ११ सहायक निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, तसेच हवालदार व शिपाई असे एकूण १२५ कर्मचारी तैनात करण्यात आले होते. (प्रतिनिधी)