शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मातेपासून होणाऱ्या संसर्गात घट

By admin | Updated: December 1, 2014 03:50 IST

प्रभावी उपचार पद्धतीमुळे एचआयव्हीबाधित रुग्णांसाठी आशेची नवी पालवी फुटली आहे. या उपचार पद्धतीमुळे या रुग्णांचे आयुष्यमान कमालीचे वाढलेले आहे

बारामती : प्रभावी उपचार पद्धतीमुळे एचआयव्हीबाधित रुग्णांसाठी आशेची नवी पालवी फुटली आहे. या उपचार पद्धतीमुळे या रुग्णांचे आयुष्यमान कमालीचे वाढलेले आहे. तर एचआयव्हीबाधित गरोदर मातांकडून त्यांच्या नवजात अर्भकाला होण्याचे प्रमाण २ ते ५ टक्क्यांवर आणण्यात बारामती उपजिल्हा रुग्णालयातील अँटी-रेट्रोव्हायरस ट्रिटमेंट (एआरटी) केंद्राला यश मिळाले आहे.एआरटीचा मुळ उद्देश एचआयव्हीग्रस्तांचे आयुष्यमान वाढविणे तसेच विषाणूंचे प्रमाण कमी करणे हा आहे. भारतात एआरटीची एकुण ४२५ केंदे्र कार्यरत आहेत. तर महाराष्ट्रात ७० केंद्रे कार्यरत आहेत.पुणे जिल्ह्यातील केंद्रात पुणे येथील वायएमसी, एएफ एमसी,नारी,बीएसआरसी रूग्णालय,जिल्हा रूग्णालय औंध आणि बारामती उपजिल्हा रूग्णालय यांचा समावेश आहे.मार्च २०१३ मध्ये महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्थेच्या माध्यमातुन बारामती उपजिल्हा रूग्णालयात तालुकास्तरिय पहिले ‘अँण्टी टेट्राव्हायरस ट्रिटमेंट (एआरटी)’केंद्र सुरू झाल्यानंतर एड्सग्रस्त रूग्णांचे आयुष्यमान वाढण्यास मदत झाली आहे.तर येथील समुपदेशनाच्या मदतीने त्यांच्यात जगण्याची नवी उमदे निर्माण होऊ लागली आहे. विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे एआरटीवर असणाऱ्या रूग्णांची संख्या वाढते आहे.या अंतर्गत उपचारांमध्ये देण्यात येणाऱ्या ‘ टीएलई ’ या गोळ्यांमुळे रूग्णांमध्ये रोगप्रतिकारकशक्ति वाढण्यास मदत होत आहे.,अशी माहिती बारामती केंद्राचे समुपदेशक उमेश आढे यांनी दिली. बारामतीतील एआरटी केंद्र सुरू झाल्यामुळे बारामतीसह अन्य तालुक्यातील रूग्णांना या समुपदेशनाचा लाभ होत आहे.२००६ नंतर मार्च पर्यंत रूग्णांच्या संख्येत वाढ झाली असली तरी एड्सग्रस्तांच्या मृत्युमध्ये घट झाली आहे. २००६ पासून बारामती उपजिल्हा रूग्णालय, रूई ग्रामीण रूग्णालय,सुपे ग्रामीण रूग्णालय येथे ‘एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र’ कार्यान्वित करण्यात आली आहेत.त्यामुळे तपासणीसाठी आलेला एखादा रूगण् संशयित वाटल्यास त्याची एआरटीपूर्व तपासणी केली जाते. यामध्ये क्षयरोग, यकृत, रिनल फंक्शनल टेस्ट आदी तपासण्यांचा समावेश होतो.