शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

खडकी जोडरस्त्याच्या ‘एनओसी’स संरक्षणमंत्री सहमत

By admin | Updated: June 9, 2015 06:17 IST

बोपखेलच्या तात्पुरत्या पुलासाठी खडकीच्या बाजूने संरक्षण हद्दीतील जोडरस्त्याचे ना हरकत पत्र (एनओसी) देण्यास संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सहमती दिली आहे.

पिंपरी : बोपखेलच्या तात्पुरत्या पुलासाठी खडकीच्या बाजूने संरक्षण हद्दीतील जोडरस्त्याचे ना हरकत पत्र (एनओसी) देण्यास संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सहमती दिली आहे. त्यामुळे लष्कराच्या अतिसंवेदनशील भागातून नागरिकांना ये-जा करणे सुलभ होणार आहे. मात्र, कायमस्वरूपी मार्गाच्या तोडग्यावर आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. बोपखेल-खडकी बाजार रहदारीसाठी सीएमईने तरंगता पूल बांधून दिला. त्यावरून रविवारपासून वाहतूक सुरू झाली. या संदर्भात संरक्षणमंत्री पर्रिकर यांच्यासमवेत सोमवारी सकाळी पुण्यात बैठक झाली. बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव, सीएमई, अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी,डिफेन्स इस्टेट, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी, मंगला कदम, नगरसेवक संजय काटे, चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते. तात्पुरत्या रस्त्याची माहिती पर्रिकर यांना देण्यात आली. तात्पुरत्या रस्त्यावर सध्या बोलू, कायमस्वरूपी रस्त्यासाठी पुढील बैठकीत चर्चा करू, असे त्यांनी स्पष्ट केले. तात्पुरत्या पुलाच्या खडकी बाजूच्या ५१२ आर्मी बेस वर्कशॉपच्या जोडरस्त्यासाठी एनओसी नसल्याने महापालिकेस डांबरीकरण आणि पथदिव्याचे काम करता येत नसल्याचे त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आज दुसऱ्या दिवशी बोपखेल आणि खडकीतील नागरिकांनी तात्पुरत्या मार्गावरुन वाहतूक केली. त्यात आज वाढ झाली. खडकी बाजारपेठेतून खरेदीचा आनंद नागरिकांनी घेतला.सध्याचा जोडरस्ता थेट ५१२ वर्कशॉप आणि अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीच्या प्रवेशद्वारावरुन जात असल्याने तो बदलून ५१२ वीज उपकेंद्राच्या शेजारून घेण्यात येणार आहे. हा जोडरस्ता सुमारे ५०० मीटरपर्यंतचा आहे. रस्ताचे एनओसी लष्कराच्या विविध विभागाकडून त्वरित खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डास देण्याच्या सूचना पर्रिकर यांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांना दिल्या. बोर्डाकडून एनओडी महापालिकेस देण्यात येणार आहेत. यामुळे तात्पुरत्या रस्त्यातील जोडरस्त्याचा उर्वरित प्रश्न मार्गी लागला आहे.