शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्णांसाठी उभारले ‘देवराई’ केंद्र

By admin | Updated: October 17, 2014 00:07 IST

मनोरुग्णांवर उपचार केल्यानंतर ते पूर्णपणो बरे होतात; परंतु ब:या झालेल्या मनोरुग्णांना आजही त्यांचे कुटुंबीय स्वीकारण्यास तयार होत नाहीत.

पुणो : मनोरुग्णांवर उपचार केल्यानंतर ते पूर्णपणो बरे होतात; परंतु ब:या झालेल्या मनोरुग्णांना आजही त्यांचे कुटुंबीय स्वीकारण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे मनोरुग्णालयातील सुमारे 2क् वर्षाहून अधिक काळापासून  राहत असलेल्या व मानसिकदृष्टय़ा स्थिर असलेल्या रुग्णांसाठी येरवडा मनोरुग्णालयाच्या आवारातच पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे. 
काही महिन्यांमध्ये हे रुग्ण समाजात मुक्तपणो संचार करू शकणार आहेत, तसेच आर्थिकदृष्टय़ा स्वत:च्या पायावर उभे राहणार आहेत.
परिवर्तन संस्था व येरवडा येथील प्रादेशिक  मनोरुग्णालयाने संयुक्तपणो इन्सेन्स प्रकल्पांतर्गत मनोरुग्णालयाच्या आवारातच ‘देवराई’ केंद्र सुरू केले आहे. ब:या झालेल्या मनोरुग्णांना विविध कौशल्य शिकवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले जाणार आहे. तसेच, त्यांना रुग्णालयाबाहेरील जगात मुक्तपणो संचार करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मनोरुग्णालयातील खोल्यांमध्ये न ठेवता  ब:या झालेल्या 5क् ते 6क् रुग्णांना या केंद्रात स्थलांतरित करण्यात आले आहे.  
या केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, सामाजिक कार्यकर्ते व परिवर्तन संस्थेचे समन्वयक  हमीद दाभोलकर, अमृत बक्षी, मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास भैलुमे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सध्या पुनर्वसन करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे. स्वयंसेवी संस्थांनी या 
उपक्रमासाठी मदत केली, तर 
अनेक रुग्णांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जीवन जगता येईल, असे नमूद करून डॉ. भैलुमे म्हणाले, 
ब:या झालेल्या रुग्णांमध्ये अनेक 
रुग्ण पदवीधर असून, त्यात 
पीएच. डी. झालेल्या एका उमेदवाराचा समावेश आहे. आता त्यांना केवळ आधार देण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)
 
रुग्णांचे पत्तेच सापडत नाहीत
भैलुमे म्हणाले, ‘‘रुग्णालयात एका वर्षाहून अधिक कालावधीपासून राहत असलेल्या रुग्णांची संख्या 6क्क् आहे, तर 2क् वर्षाहून अधिक काळ राहत असलेले रुग्ण 22क् आहेत. त्यातील काही रुग्णांचे पत्तेच सापडत नाहीत. त्यामुळे या रुग्णांना संगणक, स्क्रिन प्रिंटिंग, ग्रिटिंग, आकाश कंदील, मेणबत्ती, तसेच बारपेठेतील मागणीनुसार आवश्यक असलेल्या वस्तूंची निर्मिती करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. परिणामी, या रुग्णांना रोजगार उपलब्ध होईल. रुग्णालयातर्फे त्यांचे बँक खाते काढण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी कमावलेली रक्कम बँकेत जमा होणार आहे.’’
 
आता मानसिक आजारांवर अत्याधुनिक उपचार पद्धती आल्या आहेत. त्यामुळे मनोरुग्ण पूर्ण पणो बरे होतात. मात्र, त्यांचे कुटुंबीय तसेच समाज त्यांना स्वीकारत नाही. या रुग्णांना समाजाकडून दिली जाणारी वागणूक चुकीची आहे. त्यामुळेच ब:या झालेल्या मनोरुग्णांना त्यांच्या पायावर उभे करून समाजात मुक्तपणो वावरता यावे यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. - हमीद दाभोलकर, समन्वयक, परिवर्तन संस्था