शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

तळवडेतील ‘डीअर पार्क’ कागदावरच!

By admin | Updated: December 18, 2014 04:36 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि एमआयडीसी यांच्यातील वादामुळे रखडलेल्या तळवडे येथील नियोजित हरीण उद्यानाचे (डीअर पार्क) भवितव्य अंधारमय झाले आहे

नीलेश जंगम, पिंपरीपिंपरी-चिंचवड महापालिका आणि एमआयडीसी यांच्यातील वादामुळे रखडलेल्या तळवडे येथील नियोजित हरीण उद्यानाचे (डीअर पार्क) भवितव्य अंधारमय झाले आहे. त्यामुळे भविष्यात येथे हरणांचा वावर होणार की, हरणांचे उद्यान केवळ कागदावरच राहणार याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.राज्यातील पहिला प्रकल्प असणारा तळवडे येथील बहुचर्चित डीअर पार्क सरकारी गायरानाच्या जागेत उभारण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. या प्रकल्पामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडच्या लौकिकात भर पडेल. परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने करमणुकीचे केंद्र तयार होईल, असे सांगत या प्रकल्पाची जवळपास १६ वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. त्या दृष्टीने ९० एकर जागेत जुलै १९९८ मध्ये २५ हजार २७५ झाडांची लागवड करण्यात आली. पार्कमधील पहिल्या टप्प्यात सांबर, भेकर, चिंकारा, काळवीट या जातींची हरणे घेण्यात येणार असून, उद्यानात रस्ते, तलाव, नाले यांची कामे आहेत. नागरिकांना वाहनामध्ये बसून मुक्त अवस्थेत हरीण पाहता येईल, असे सांगण्यात आले होते. तथापि पालिका आणि एमआयडीसीच्या वादात या प्रकल्पासाठी अद्याप जागाच ताब्यात मिळाली नाही. यामुळे १६ वर्षांपासून हा प्रकल्प कागदावरच आहे.तळवडे परिसरात ८० हेक्टर गायरान होते. त्यांपैकी ४२ हेक्टर जागा एमआयडीसीला देण्यात आली होती. यातील ३८ हेक्टर जागा शिल्लक राहते. यातून २० हेक्टर जागा जानेवारी २००२ मध्ये पुन्हा एमआयडीसीला हस्तांतरीत करण्यात आली. मात्र जागेचा ताबा त्यांना देण्यात आला नाही. ज्यामुळे डीअर पार्कसाठी १८ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले. मात्र इतके क्षेत्र या प्रकल्पासाठी अपुरे पडत असल्याने एमआयडीसीला हस्तांतरित करण्यात आलेली जागा परत पालिकेकडे वर्ग करावी, अशी मागणी झाली. तथापि शासन दरबारी याबाबत कोणतीही हालचाल झाली नाही. त्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला. जमीन ताब्यात येताच प्रकल्पाची कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. या संदर्भात शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत. शासनाकडून जागेचा तिढा सुटला की, कार्यवाही करता येईल, तोपर्यंत काहीही करणे अवघड आहे असे सांगण्यात येते.