शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दीपक मानकर यांच्या अडचणींत वाढ, अटकपूर्व जामीन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 03:38 IST

माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयातील आणखी एका खंडपीठाने नकार दिला आहे.

पुणे  - माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयातील आणखी एका खंडपीठाने नकार दिला आहे.न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी असमर्थता दर्शवल्याने आता हा अर्ज सुनावणीसाठी दुसऱ्या न्यायालयात वर्ग करावा, अशी विनंती रजिस्ट्रार यांनी केली आहे. मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. पण याचिकेवर सुनावणी घेण्यास खंडपीठाने असमर्थता दाखविली. त्यानंतर मानकर यांनी दुसºया खंडपीठापुढे याचिका सादर केली होती. मात्र त्याही खंडपीठाने सुनावणीस नकार दिला आहे. त्यामुळे आता मानकर यांना नव्या खंडपीठासमोर याचिका सादर करावी लागणार आहे. मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाºया जितेंद्र जगताप यांनी २ जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जितेंद्र जगताप यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दीपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे पोलिसांनी जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विनोद रमेश भोळे (वय ३४, रा़ जोशीवाडी, घोरपडे पेठ), सुधीर दत्तात्रय सुतार (वय ३०,रा़ जयभवानीनगर, कोथरुड), अमित उत्तम तनपुरे (वय २८, रा़ मांडवी खुर्द), अतुल शांताराम पवार (वय ३६) आणि विशांत श्रीरंग कांबळे (वय ३०, रा़ शांतीनगर येरवडा), कुख्यात गुंड नाना कुदळे (रा़ केळेवाडी) आणि अजय कंधारे यांना अटक करण्यात आली होती. मानकर आणि कर्नाटकी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे़या प्रकरणातून अटकपूर्व जामीन मिळावा, म्हणून दीपक मानकर यांनी सर्वप्रथम शिवाजीनगर येथील न्यायालयात अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आला. त्यानंतर मानकर यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावर सुनावणी घेण्यास खंडपीठाने नकार दिला. त्यामुळे त्यांनी दुसºया खंडपीठाकडे अर्ज सादर केला होता. दुसºया खंडपीठानेदेखील त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता दाखविली.

 

टॅग्स :Courtन्यायालयnewsबातम्या