शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही धरण पाणलोट क्षेत्रात तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: April 25, 2016 02:40 IST

दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरू होण्यास अजून दीड ते पावणेदोन महिने आहेत.

भोर : दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरू होण्यास अजून दीड ते पावणेदोन महिने आहेत. मात्र भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त १२ टक्के तर नीरा देवघर धरणात १६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दोन्ही धरण भागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू झाली आहे. टँकरची मागणी करून दीड महिना झाला तरी अद्याप एकही टँकर सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांची व जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. टँकर सुरू करा. अन्यथा हंडा मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा दोन्ही धरण भागातील संतप्त नागरिकांनी दिला आहे. भोर तालुक्यात २०१५ मध्ये पाऊस कमी प्रमाणात झाल्याने दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने न भरता ७० टक्केच भरली होती. तरीही भाटघर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी खाली सोडल्याने धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाला असून, यामुळे पाण्याचा खांडवा कुरुंजी गावाच्या खाली आला आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप दीड महिना असून, धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने दोन्ही धरण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. धरणाचा खांडवा मळे गावापर्यंत आला असून, पाणी गावापासून दोन ते तीन किलोमीटरवर गेले आहे. यामुळे अनेक गावांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे अनेकदा गाळमिश्रित पाणीपुरवठा होत असून यामुळे साथीचे आजार वाढत आहेत. तर दोन मोटारीमुळे वीजबिल अधिक प्रमाणात येत आहे. मात्र आता धरणात पाणीच नसल्याने टँकरशिवाय कोणताच पर्याय नाही. (वार्ताहर)