शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कांदा, मटारच्या भावात घट

By admin | Updated: January 9, 2017 02:20 IST

गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी कांदा, बटाटा, आले या फळभाज्यांच्या भावात घट झाली. तर वांगी, फ्लॉवरचे भाव काहीप्रमाणात वाढले.

पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी कांदा, बटाटा, आले या फळभाज्यांच्या भावात घट झाली. तर वांगी, फ्लॉवरचे भाव काहीप्रमाणात वाढले. इतर फळभाज्या व पालेभाज्यांचे भाव स्थिर राहिले.रविवारी बाजारात १६० ते १७० ट्रक शेतमालाची आवक झाली. कांद्याची आवक जवळपास २०० ट्रक आवक झाल्याने मागील आठवड्याच्या तुलनेत १० किलोमागे २० रुपयांची घट झाली. कांद्याला ६० ते ८० रुपये भाव मिळाला. बटाट्याची आवकही सुमारे ९० ट्रक झाल्याने भाव उतरले आहेत. बाजारात मध्य प्रदेशातून मटारची तब्बल ३० ते ३२ ट्रक आवक झाली. मागील काही दिवसांच्या तुलनेत रविवारी झालेली आवक मोठी होती. स्थानिक भागातूनही ३०० ते ३५० गोणी आवक झाली. त्यामुळे भावात पुन्हा घट झाली. हिरवी मिरची, कोबी, फ्लॉवर, गाजराची आवकही चांगली होत आहे. मागणीच्या तुलनेत माफक आवक असल्याने भाव स्थिर राहिले. टोमॅटोची आवक ५.५ ते ६ हजार पेटी झाली. आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने टोमॅटोचे भाव दहा किलोमागे ४० ते ६० रुपयांपर्यंत स्थिरावले. तांदूळ, साबुदाणा तेजीतभुसार बाजारात आवक कमी होत असल्याने तांदूळ, साबुदाणा, नारळाच्या भावात वाढ झाली. तूरडाळीसह हरभराडाळीचे भावही उतरले आहेत. भाजकी डाळ व बेसनाच्या भावातही घट झाली. मार्केट यार्डातील भुसार बाजारात कोलम व आंबेमोहोर तांदळाच्या भावात काहीशी तेजी आहे. नोटाबंदीमुळे वाहतूक खचार्मुळे तांदळाची आवक होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. लिंबू, डाळिंबाची भाववाढ : फळांचे भाव स्थिरफळबाजारात आवक कमी झाल्याने लिंबु व डाळिंबाच्या भावात वाढ झाली. उत्पादन क्षेत्रातच लिंबाची खरेदी वाढल्याने रविवारी बाजारात सुमारे ५ हजार गोणी आवक झाली. त्यामुळे भाव ४० ते ५० टक्क्यांनी वाढले. लिंबाला गोणीमागे ६० ते १६० रुपये भाव मिळाला. डाळिंबाची आवक २५ ते ३० टन झाल्याने भावात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली. तर द्राक्षाची आवक वाढल्याने भावात २० ते २५ टक्के घट झाली. थंडीमुळे कलिंगड, खरबुजाची आवक कमी झाली. इतर फळांचे भाव स्थिर राहिले.रशियातील सफरचंद पुण्यात४पुणे : रशियातून रॉयल गाळा, रॉयल मस्ट, रेड चीफ या सफरचंदाची पुण्यातील फळबाजारात आवक सुरू झाली आहे. या सफरचंदाचा दर्जा चांगला, चवीला गोड असल्याने मागणी आहे.४मार्केट यार्डातील फळबाजारात यंदा पहिल्यांदाच रशियन सफरचंदाची आवक वाढली आहे. रविवारी या हंगामात पहिल्यांदाच १५० बॉक्सची आवक झाली.४२२ किलोच्या बॉक्सला १८०० ते २२०० रुपये भाव मिळाला. पुढील तीन महिने या सफरचंदाची आवक सुरू राहील, अशी माहिती व्यापारी कुणाल काची यांनी दिली.फुलांना मागणी कमीफुलबाजारात बहुतेक फुलांची आवक कमी झाली आहे. सजावटीच्या फुलांची मागणी कमी झाल्याने भावात घट झाली. रविवारी बाजारात झेंडूला प्रतिकिलो २० ते ३० रुपये व गुलाबाला २० नगांमागे २० ते ६० रुपये भाव मिळाला. जर्बेरा व कॉर्नेशियनच्या भावातही मोठी घट झाली.