शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

हगणदरीमुक्तीचे मानपत्र!

By admin | Updated: September 7, 2016 01:32 IST

हगणदरीमुक्त जिल्हा ही मोहीम सध्या जिल्ह्यात जोरात सुरू असून, याला गती देण्यासाठी जो जिल्हा परिषद गट हगणदरीमुक्त होईल त्या सदस्याला मानपत्र दिले जाणार

पुणे : हगणदरीमुक्त जिल्हा ही मोहीम सध्या जिल्ह्यात जोरात सुरू असून, याला गती देण्यासाठी जो जिल्हा परिषद गट हगणदरीमुक्त होईल त्या सदस्याला मानपत्र दिले जाणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.पुढील आठवड्यात बुधवारी (दि.१४ सप्टेंबर) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्यांचा अभिनंदनाचा ठराव करून गौरविण्यात येणार आहे. शासनाने या वर्षी दहा जिल्हे हगणदरीमुक्त करण्याचे ठरवले असून, यात पुणे जिल्हाही आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने त्या दृष्टीने काम सुरू केले असून, गेल्या चार महिन्यांत वेगाने काम सुरू आहे. आजच्या तारखेला ९३ हजार २९९ कुटुंबांकडे शौचालये नाहीत. जिल्हा ३१ डिसेंबरपर्यंत हगणदरीमुक्त करण्याचे ठरविले असले, तर ३० सप्टेंबरपर्यंतच ते टार्गेट पूर्ण करण्याचे ठरविले आहे. सध्या गृहभेट अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील २२ हजारांहून जास्त जिल्हा परिषद कर्मचारी स्वच्छ भारत मिशनसाठी गावपातळीवर कार्य करीत आहेत. शौचालय नसलेल्या कुटुंबांना भेटी देऊन शौचालयाचे महत्त्व सांगत आहेत. २ आॅक्टोबर २०१६ रोजी याच अभियानाचा भाग म्हणून एकाच दिवशी सर्व ग्रामपंचायतीमध्ये गृहभेट आणि स्वच्छता उपक्रम साजरा करून राज्यात महास्वच्छता दिन साजरा केला जाणार आहे. तसेच शौचालय नाही त्यांच्या घरी जाऊन बँड व हलगीपथक जाऊन वाजविण्यात येणार आहे. ही मोहीम सुरू झाली त्या वेळी घेतलेल्या आढाव्यात जिल्हा परिषद सदस्यांच्या गटात शौचालयाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याचे दिसले होते.हे सर्व सदस्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर तेथील कामांना गती मिळाली आहे. हे काम आणखी वेगाने व्हावे म्हणून आता ज्या जिल्हा परिषद सदस्याचा गट हगणदरीमुक्त होणार आहे, त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)