शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपाती वाढीबाबत लवकरच निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 01:36 IST

धरणसाठ्यातील उपलब्ध पाणीसाठा विचार घेऊन शहराच्या पाणीकपातीमध्ये आणखी वाढ करायची का याचा निर्णय महापालिका प्रशासनातर्फे येत्या दोन दिवसांत घेतला जाणार आहे.

पुणे : धरणसाठ्यातील उपलब्ध पाणीसाठा विचार घेऊन शहराच्या पाणीकपातीमध्ये आणखी वाढ करायची का याचा निर्णय महापालिका प्रशासनातर्फे येत्या दोन दिवसांत घेतला जाणार आहे. उपलब्ध पाणी जूनअखेरपर्यंत पुरवावे लागणार असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दौंड, इंदापूर तालुक्यातील नदीलगतच्या गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी खडकवासला धरणातून १.६० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जिल्हास्तरीय पाणी नियोजन समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर शहराच्या पाणीकपातीचा फेरआढावा घेण्यासाठी येत्या दोन दिवसांत बैठक घेतली जाणार असल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी स्पष्ट केले आहे.यंदा सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने धरणामध्ये निम्माच पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये ३० टक्क्यांनी कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील दौंड, इंदापूर येथे पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना खडकवासला धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा पाणी नियोजन समितीमार्फत पाणी सोडण्याचे निर्णय घेतले जातात. सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार बाबूराव पाचर्णे, दत्तात्रय भरणे, राहुल कुल, सुरेश गोरे, जिल्हाधिकारी सौरव राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते.धरणसाठ्यातील पाण्याचे नियोजन करताना १५ जुलैपर्यंतच्या पाण्याचे नियोजन केले जाते. दौंड, इंदापूरला पाणी सोडल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या धरणात उपलब्ध असलेल्या पाण्याचा फेरआढावा घेतला जाणार आहे.