शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी डॉ. बाबा आढाव यांचं उपोषण सुरू

By admin | Updated: October 2, 2016 20:50 IST

शेतमालाला हमीभाव आणि शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी रविवारपासून उपोषण

राजानंद मोरे/ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 2 - शेतमालाला हमीभाव आणि शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी रविवारपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी शेतकरी संघटनेसह विविध संघटनांनी उपोषणाला पाठिंबा देत आंदोलन व्यापक करण्याचा निर्णय घेतला. 

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर डॉ. आढाव यांनी उपोषणाला सुरूवात केली. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील, माजी न्यायमुर्ती पी. बी. सावंत, आपचे विजय पांढरे यांनी उपस्थित राहून उपोषणाला पाठिंबा जाहीर केला. महामंडळाचे संतोष नांगरे, नवनाथ बिनवडे आदी उपस्थित होते. 
 
उपोषणामागची भुमिका स्पष्ट करताना डॉ. आढाव म्हणाले, मराठा समाज आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला असला तरी केवळ आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी यावर जास्त बोलले जास्त बोलले जात आहे. शेतमालाला हमीभाव मिळण्यावर फारशी चर्चा होत आहे. त्यासाठी आम्ही महात्मा गांधींच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जमुक्ती आणि हमीभाव मिळावा यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले असून ते पुढेही सुरूच राहणार आहे. हमीभावाचा मुद्दा जनतेत गेला पाहिजे. नियमनमुक्तीच्या निर्णयानंतर अनागोंदी निर्माण झाली आहे. सरकार हमीभावाचा निर्णय घेत नसल्याने शेतकºयांची दैना होणार आहे. 
 
रघूनाथ पाटील म्हणाले, काँग्रेसच्या काळात एका दिवसात आठ शेतकरी आत्महत्या करत होते. आता ती संख्या दुप्पट झाली आहे. सरकार बदलले असले तरी शेतकºयांची स्थिती कायम आहे. आढाव यांच्या आंदोलनामुळे शेतकरी व हमाल पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या दोन घटकांपुरते हे आंदोलन मर्यादित न राहता राज्यभर व्यापक करण्याचा विचार आहे. रस्ते, उ्डडाणपुल बांधण्यासाठी शासनाकडे पैसे असतात. पण शेतकºयांना देण्यासाठी हात रिकामे असतात, अशी टीकाही पाटील यांनी केली.