केडगाव : हंडाळवाडी (ता. दौंड) परिसरामध्ये रोहित्र दुरुस्त करताना विजेचा शॉक बसल्याने रोहित्राला चिकटून वायरमनचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१९) सायंकाळी घडली.
योगेश शेळके असे मृत्यू झालेल्या वायरमनचे नाव आहे. ग्रामीण भागामध्ये वायरमनच्या हाताखाली काम करणारे काही युवक असतात. शासन त्यांना कसलाही पगार देत नाही. परंतु सर्व जोखमीची कामे हे युवक करत असतात. वय झालेल्या वायरमन शक्यतो विद्युत रोहित्र किंवा खांबावरती चढत नाही. हाताखालील युवक तटपूंजा पैशांमध्ये वरील नोकरी करतात. योगेश हा त्यापैकीच एक होता. शनिवारी सायंकाळी विद्युत रोहित्राचे काम करत असताना अचानक धक्का लागल्याने योगेशचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. योगेशच्या कुटुंबीयांना महावितरणने नुकसानभरपाई द्यावी. तसेच शेळके कुटुंबातील एक जणाला शासकीय नोकरीमध्ये घ्यावे, अशी मागणी केडगाव ग्रामस्थांनी केली आहे.
फोटो : योगेश शेळके