राजगुरुनगर : येथील केदारेश्वर बंधाऱ्यावरुन भीमा नदीच्या पात्रामध्ये एका बावीस वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.११) रात्रीच्या सुमारास घडली.राजू उर्फ आफताब अशपाक सय्यद (रा.चांडोली, ता.खेड,मुळ गाव-सॉडी, जि.हरदोई, उत्तरप्रदेश) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो राजगुरुनगरमधील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत होता. रात्री काम झाल्यानंतर तो सायकलवरुन बंधाऱ्यावरुन चांडोलीला जात असताना त्याचा तोल जाऊन तो नदीच्या पाण्यात पडला. त्याला पोहता येत नव्हते. तेथून ये-जा करणाऱ्या लोकांनी पाहिल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. राजगुरुनगर पोलीसांनी पाण्यात बुडून मृत्यू अशी नोंद केली आहे. (वार्ताहर)
बंधाऱ्यात बुडून तरुणाचा मृत्यू
By admin | Updated: January 13, 2017 02:07 IST