शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, महावितरणाचा हलगर्जीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 02:21 IST

बावधन बुद्रुक येथील सिद्धार्थ नगर येथे विजेच्या खांबाला हात लागुन शॉक बसल्याने तरुणाचा दुर्दवी मृत्यु झाल्याची घटना काल घडली.

भूगाव: बावधन बुद्रुक येथील सिद्धार्थ नगर येथे विजेच्या खांबाला हात लागुन शॉक बसल्याने तरुणाचा दुर्दवी मृत्यु झाल्याची घटना काल घडली. या घटनेने महावितरणाचा हलगर्जीपणा उघड झाला असुन घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.शुभम प्रविण पवार (वय १७ वर्षे, रा. बाबाकृपा बिल्डीग, विठ्ठल मंदिरा जवळ, बावधन बुद्रुक, ता. मुळशी) असे तरुणाचे नाव असुन बावधन गावठाणातील राजगुरु चौकामध्ये भर गर्दिच्या ठिकाणी कोपऱ्यावरच असलेल्या विजेच्या पोलला दुपारी साडेतीनच्या दरम्यान हात लागल्याने जोरदार झटका बसला. येथील नागरिकांनी त्याला त्वरीत खासगी रुग्नालयात दाखल केले. परंतु काही वेळाने डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.परिसरातील बावधन गावठाणाव्यतीरिक्त सर्व ठिकाणी विद्युत तारा ह्या भुमीगत झाल्या आहेत. या भागातील विद्युततारा भूमीगत कराव्यात यासाठी ग्रामपंचायत सदस्य मयुर कांबळे यांनी वारंवार महावितरणाशी पत्रव्यवहार केला होता. परंतु अधीकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.बावधन बुद्रुक मध्ये सध्या रहदारी वाढत आहे. बाजाराच्या ठिकाणी अनेक ठिकाणी विद्युत तारा जमीनीपासुन अगदी जवळ आल्या आहेत. मिरवणुक अथवा मोठ्या गाड्या आल्यास या ठिकाणी वायरमनला फोन करुण विज बंद करावी लागते.याच परिसरात काही महिण्यांपूर्वी मंदिरावर ध्वज काढण्यासाठी एका विद्यार्थ्यालाही झटका बसला असल्याची घटना ताजी असताना महावितरणाला जाग कशी येत नाही? आणखी किती बळी गेल्यावर यावर उपाय काढणार असा संतप्त सवाल नागरिकांकडुन विचारला जात आहे.>बावधन गावठाण परिसरात भर बाजाराच्या ठिकाणी विजेच्या तारा धोकादायक परिस्थितीत आहे. अनेक घरांच्या पत्रा, गॅलरीजवळुन विजेवाहक तारा गेल्या आहेत. यामुळे वरंवार अपघात होत आहे. अनेकदा तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या तारा त्वरित हटवुन भुमीगत कराव्यात.- मयुर कांबळे(ग्रामपंचायत सदस्य, बावधन)यासंबंधी सर्व माहिती विद्युत निरिक्षकांना कळविली असुन त्यांचा आहवाल आल्यास घटनेचे कारण स्पष्ट होईल. विद्युततारा भुमिगत करण्याचे काम चालु असुन लवकरच याठीकाणच्या तारा भुमीगत करण्यात येतील.-निशीकांत राऊत (जनसंपर्क अधिकारी, महावितरण)