शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांच्या हल्ल्यातील जखमी पत्नीचाही मृत्यू

By admin | Updated: April 11, 2016 00:43 IST

बारामती तालुक्यातील मोरगाव येथे चार दिवसांपूर्वी सशस्त्र दरोड्यातील गंभीर जखमी झालेल्या पतीपाठोपाठ जखमी पत्नीचाही शनिवारी (दि. ९) मध्यरात्री मृत्यू झाला

मोरगाव : बारामती तालुक्यातील मोरगाव येथे चार दिवसांपूर्वी सशस्त्र दरोड्यातील गंभीर जखमी झालेल्या पतीपाठोपाठ जखमी पत्नीचाही शनिवारी (दि. ९) मध्यरात्री मृत्यू झाला. येथील गुन्ह्याचा तपास करण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना अपयश आले आहे. पुढील आठ दिवसांत तपास करावा; अन्यथा आम्हाला पर्याय शोधावा लागेल, असा पवित्रा आज ग्रामस्थांनी घेतला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि. ११) मोरगाव ‘बंद’चा इशारा देण्यात आला आहे. मोरगाव-जेजुरी रस्त्यालगत असलेल्या जय गणेश मंगल कार्यालयाशेजारी राहत्या घरी मंगळवारी (दि. ६) ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये जगन्नाथ विठ्ठल तावरे यांच्यासह पत्नी कमल जगन्नाथ तावरे यांच्यावर पहाटे ४ च्या सुमारास अज्ञात तीन दरोडेखोरांनी हल्ला करून जबर मारहाण केली होती. यादिवशी गावात अन्य दोन ते तीन ठिकाणी या दरोडेखोरांनी घरात घुसून अशाच स्वरूपाची जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला. आज या दोघांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर हजारोंच्या संख्येत ग्रामस्थांनी या परिसरात गर्दी केली. यांच्या घरासमोर दोघांचे पार्थिव सकाळी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या विषयाचे गांभीर्य पाहता अनुचित प्रकार घडू नये, म्हणून ग्रामीण पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचारी यांचा पोलीस बंदोबस्त येथे ठेवण्यात आला होता. या प्रकरणाचा वडगाव निंबाळकर पोलिसांना योग्य तपास लागत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. घटनेच्या दिवशी मोरगाव पोलीस मदत केंद्रात एकही कर्मचारी हजर नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत गंभीर दखल घ्यावी, आठ दिवसांत आरोपीचा शोध घ्यावा; अन्यथा परिणामांना तयार राहा, असा इशारा नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बबन अप्पा तावरे यांनी श्रद्धांजली वाहताना दिला आहे. (वार्ताहर)> सहा महिन्यांतील हा दुसरा प्रकारवडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील या गावांत सशस्त्र दरोडा टाकण्याचा सहा महिन्यांतील हा दुसरा प्रकार आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे. या गुन्हेगारांना शोधण्यास अपयश आल्याचा आरोप करीत, या वेळी श्रद्धाजंली वाहत असताना जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नीरा बाजार समिती माजी संचालक बबन अप्पा तावरे यांच्यासह सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक पोपटराव तावरे यांनी दिली.