पुणे : बांधकाम साईटवरच्या लिफ्टची दोरी तुटल्याने पाचव्या मजल्यावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू झाला. आंबेगाव खुर्द येथील ए. बी. डेव्हलपर्स इमारतीच्या बांधकाम साईटवर ही घटना घडली. या प्रकरणी मालकासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तमदास अंजोरदास धतलहरे (वय २२, रा. लेबर कॅम्प) हा कामगार मृत्युमुखी पडला आहे. अशोक रमेश बोगम (रा. स. नं. ३९/१ आंबेगाव), दुष्यंत वसंत अतकरे (रा. गुरुप्रसाद अपार्टमेंट, शनिनगर, भारती विद्यापीठ), भीमा अण्णा गांगुली (रा. आंबेगाव बुद्रुक शाळा, आंबेगाव) यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार अंकुश खुटवड यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. काळे करीत आहेत. (प्रतिनिधी)
लिफ्ट पडल्याने कामगाराचा मृत्यू
By admin | Updated: April 25, 2017 04:20 IST