पिंपरी : मागील आठवड्यापासून स्वाइन फ्लूने शहरात दररोज एक बळी जात आहे. स्वाइन फ्लूची तीव्रता वाढत असतानाही प्रशासन अजूनही गाफील असल्याचे दिसून येत आहे. स्वाइन फ्लूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सोमवारी आणखी एका महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. वल्लभनगर येथील सुनीता नरेंद्र कोंगे (वय ४०) यांचा यशवंतराव चव्हण स्मृती रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. त्यांना स्वाइन फ्लूची लश्रणे दिसत असल्याने २० फेब्रुवारी रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल रुग्णालयाला २४ फेब्रुवारी रोजी मिळाला होता. त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले होते. प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना २ मार्च रोजी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. या आजाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार केले आहे. सोमवारी शहरातील रुग्णालयात ६ हजार ५६६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १ हजार ५०९ जणांना सर्दी, ताप, खोकला असे आजार दिसून आले. (प्रतिनिधी)
वल्लभनगरच्या महिलेचा मृत्यू
By admin | Updated: March 10, 2015 04:54 IST