शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

विंचू चावल्यामुळे महिलेचा मृत्यू

By admin | Updated: March 17, 2017 02:04 IST

खोडद (ता. जुन्नर) येथील सुलाबाई लक्ष्मण एरंडे (वय ६५) यांचा नुकताच विंचू चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आणि विंचूदंशाबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ या घटनेतून आली आहे.

खोडद : खोडद (ता. जुन्नर) येथील सुलाबाई लक्ष्मण एरंडे (वय ६५) यांचा नुकताच विंचू चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आणि विंचूदंशाबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ या घटनेतून आली आहे.सुलाबाई एरंडे यांना रविवारी (दि.१२) सकाळी ७:३० च्या सुमारास विंचू दंश झाला. विंचू चावल्यानंतर पोटात दुखू लागल्यामुळे स्थानिक डॉक्टरांकडे प्रथोमपचार करून पुढे नारायणगावला आणि नंतर पुण्याला अद्ययावत हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. सोमवारी सकाळी ६:३० वाजता सुलाबाई एरंडे यांचा मृत्यू झाला.काही दिवसांपूर्वी माळशेज घाटात एक कुटुंब फिरायला आले होते. या कुटुंबातील एका २वर्षांच्या मुलाला विंचू दंश झाला होता. या वेळी तत्काळ विंचू दंशावरील लस देऊन इतर तातडीचे उपचार केल्याने या मुलाचा जीव वाचविण्यात यश आले. विंचू चावून प्रकृती गंभीर झाल्याच्या ४ घटना जुन्नर तालुक्यात घडल्या आहेत. मात्र त्यांना वेळीच तातडीचे उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला आहे. अशी माहिती नारायणगावमधील सर्पदंश व हृदय विकार तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी दिली. (वार्ताहर)