शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अवसरी येथे होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या बिबट्यांची आई जेरबंद ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 20:30 IST

अवसरी बुद्रुक गावातील गुणगे-शेटे मळा येथे ऊसाच्या शेताला लावलेल्या आगीत पाच बछड्यांचा होरपळून मृत्यु झाला होता.

ठळक मुद्देअवसरी येथे लावला होता पिंजरा : ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन

अवसरी :  आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील अवसरी बुद्रुक -गावडेवाडी येथे बिबट्याची मादी जेरबंद करण्यात वनखात्याला गुरुवारी (दि.४) यश आले.  बुधवारी आगीत होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या पाच बछड्यांची ही आई असावी असा अंदाज  मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रज्योत पालवे यांनी व्यक्त केला.  या परिसरातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.आंबेगाव तालुक्यात बिबट्यांची मोठी संख्या आहे. सध्या उसतोड सुरू असल्याने बिबट्याचा अधिवास कमी होत आहे. यामुळे बिबट्या आणि मानवाचा संघर्ष वाढू लागला आहे.  मंगळवारी निगगुडसर येथे एका बिबट्याने शेतक-यावर हल्ला केल्या होता. ही घटना ताजी असतांनाच बुधवारी अवसरी बुद्रुक गावातील गुणगे-शेटे मळा येथे ऊसाच्या शेताला लावलेल्या आगीत पाच बछड्यांचा होरपळून मृत्यु झाला होता. या घटनेमुळे बिबट्यांची आई पिल्लांच्या मृत्युमुळे सैरभैर झाल्याने त्या परिसरात शेतक-यांनी जावु नये, असे आवाहन मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रज्योत पालवे यांनी केले होते. यामुळे या मादीला जेरबंद करण्यासाठी वनविभागामार्फेत  या ठिकाणी पिंजरा बसविण्यात आला होता. या पिंज-यात पहाटे बिबट्याची मादी जेरबंद झाली.  या बछड्यांचीच ही आई असावी असा अंदाज पालवे यांनी व्यक्त केला आहे. या मादीची वैद्यकीय तपासणी करून तिला पुन्हा तिच्या अधिवासात सोडून देण्यात आले.

टॅग्स :ambegaonआंबेगावleopardबिबट्याforest departmentवनविभाग