शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाडसाचा मृत्यू

By admin | Updated: May 8, 2017 02:08 IST

बारामती तालुक्यातील मुढाळे गावच्या वनविभागाच्या हद्दीलगत मुळीकवस्तीजवळ हरणांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने

लोकमत न्यूज नेटवर्कवडगाव निंबाळकर : बारामती तालुक्यातील मुढाळे गावच्या वनविभागाच्या हद्दीलगत मुळीकवस्तीजवळ हरणांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला चढवला. यामध्ये एका पाडसाचा मृत्यू झाला. शनिवारी (ता. ६) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.अन्नपाण्याच्या शोधात सकाळपासून हरणांचा कळप मानवीवस्तीलगत फिरत होता. या परिसरातील कुत्र्यांच्या टोळीने कळपाचा पाठलाग केला. यामध्ये पाडस कळपातून पाठीमागे राहिल्याने कुत्र्यांनी त्याचा चावा घेतला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी कुत्र्यांना हुसकावले. पण चाव्याची जखम खोल असल्याने पाडसाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत जमीर मुजावर, दत्तात्रेय खोपडे, शिवाजी मुळीक, प्रतीक मुळीक या तरुणांनी झालेल्या अपघाताची माहिती वनविभागाला कळवली. वनमजूर एसबी पानसांडे यांच्यासह ४ वनमजुरांनी पंचनामा करून पाडस ताब्यात घेतले. मुढाळे गावालगत वनविभागाची मोठी जमीन आहे. या ठिकाणी हरणांची संख्या जास्त आहे. गेल्या महिन्याभरापासून वनहद्दीतील प्राण्यांचे अन्नपाण्यावाचून हाल होत असल्याने त्यांची सोय करावी, अशी मागणी जोर धरत होती. पण बारामती वनविभागाने ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. या ठिकाणी कृत्रिम पाणवठे आहेत. मात्र त्यात घाण साचली आहे. जमिनीवरील टाक्यात पाणीच टिकत नसल्याचे चित्र आहे. परिणामी या भागातील हरणांचे कळप बागायती भागातील मनुष्यवस्तीकडे येतात. मानवीवस्तीजवळ कुत्र्यांची संख्या अधिक असते. या परिसरात पोल्ट्री असल्याने मृत कोंबड्या उघड्यावर टाकल्या जातात. कोंबड्यांच्या मांसावर चटावलेल्या कुत्र्यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. याच टोळ्या हरणांच्या कळपावरही नजर ठेवतात. आजारी हरिण किंवा पाडसावर आक्रमण करून जखमी करतात. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. शनिवारी सकाळी कुत्र्यांनी हरणाच्या पाडसाचा पाठलाग केल्याचे जवळच्या शेतकऱ्याने पाहिले होते. कुत्र्यांना हटकण्याचा प्रयत्नही त्यांनी केला, पण कुत्र्यांच्या चाव्याने घाबरलेल्या पाडसाचा मृत्यू झाला होता. यापुढे वनविभागने येथील हरणांची काळजी घेतली पाहिजे. अन्नपाण्याची सोय केली पाहिजे, अशी अपेक्षा प्राणीमित्रांनी केली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करणारयापुढे असे अपघात होणार नाहीत, यासाठी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येईल. परिसरातील पोल्ट्रीमालकांना सक्त सूचना देण्यात येणार आहेत. पाणीसाठ्याबाबत पाहणी करून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती तालुका वनअधिकारी शिवाजी राऊत यांनी दिली.