शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बधिर पोलीस : हातवाऱ्यांच्या भाषेला समजले चिथावणी, विद्यार्थ्यांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:45 IST

समाजकल्याण कार्यालयासमोर कर्णबधिर विद्यार्थ्यांवर लाठीमार : सर्व स्तरांतून पोलिसांबाबत संताप

पुणे : कर्णबधिर आंदोलक विद्यार्थ्यांना त्यांच्या नेत्यांकडून हातवाऱ्यांच्या भाषेद्वारे दिल्या जाणाºया सूचनांना पोलिसांनी चिथावणी समजल्यानेच लाठीमाराचा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याबाबत, आदेश कोणत्या अधिकाºयाने दिले, कर्णबधिर विद्यार्थी असल्याचे पोलिसांना माहीत नव्हते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कर्णबधिर विद्यार्थ्यांनी केवळ ‘ठिय्या आंदोलना’ची परवानगी घेतली होती. मोर्चाची परवानगी नव्हती, असे पोलिसांतर्फे सांगण्यात येत आहे; परंतु तरीही कोणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून का सांगितले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.यामध्ये दहा ते बारा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांचे ‘ठिय्या आंदोलन’ सुरू होते.परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून माफक लाठीचार्ज केल्याचा पोलिसांचा दावाआंदोलक कर्णबधिर विद्यार्थ्यांनी समाजकल्याण कार्यालय याठिकाणी मोर्चा काढला होता. साधारण हजार ते दीड हजार विद्यार्थ्यांचा तो जमाव होता. मुळातच त्यांच्याशी कशाप्रकारे संवाद साधावा हे पोलीस प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह होते. त्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि आंदोलनामुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये याची काळजी पोलीस प्रशासनाला घ्यावी लागली. आंदोलनकर्त्यांमधील एक नेता भिंतीवर चढला. त्याने सांकेतिक भाषेत आपल्या इतर सहकाºयांना येण्यास खुणावले. त्यामुळे ज्याठिकाणी बॅरिकेड लावण्यात आले होते, ते पाडून त्या विद्यार्थ्यांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. यात पोलिसांच्या अंगावर बॅरिकेड पडले. काही ठिकाणी पोलीस खाली पडले. विद्यार्थ्यांना रोखण्याकरिता पोलिसांनी प्रयत्न केला; मात्र त्याचा काही उपयोग न झाल्याने त्यांना बळाचा उपयोग करावा लागला. परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ नये याकरिता माफक प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला, असे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी सांगितले. 

कर्णबधिर आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीहल्ला निषेधार्ह असून, या असंवेदनशील प्रकाराची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी. नोकºया आणि शिक्षण याबाबत येणाºया अडचणी सोडविण्यासाठी राज्यभरातून कर्णबधिर आंदोलक जमले होते. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ते मुंबईपर्यंत जाणार होते. लोकशाही मार्गाने ते आंदोलन करीत होते. त्यांच्या भावना समजावून घेऊन प्रकरण हाताळण्याऐवजी त्यांच्यावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या प्र्रकाराचा निषेध करावा तितका थोडा आहे.- मोहन जोशी, माजी आमदार