शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सांगवीमध्ये रियल इस्टेट व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 16:09 IST

रात्रीचे जेवण झाल्यानंतर शतपावलीसाठी बाहेर पडलेल्या रियल इस्टेट व्यावसायिक तरुणाला दगडाने मारहाण करुन प्राणघातक हल्ला करण्यात आला.

पिंपरी : रात्रीचे जेवण झाल्यानंतर शतपावलीसाठी बाहेर पडलेल्या रियल इस्टेट व्यावसायिक तरुणाला दगडाने मारहाण करुन प्राणघातक हल्ला करण्यात आला. डोक्यात, तोंडावर जखमा झाल्या असून खासगी रुग्णालयात त्यास दाखल केले आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडला. संदीप जगताप असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. रेणुका संदीप जगताप (वय ३९ , रा. वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी) यांनी या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका यांचे पती संदीप यांना रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्याची सवय आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास रात्रीचे जेवण झाल्यानंतर ते शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले. सोसायटीच्या बाहेरच्या बाजूला गेले असताना सव्वादहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात दगड फेकून मारला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संदीप रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. या व्यवसायातील स्पर्धेतून कोणी असा प्रकार केला की अजून दुसरे काही कारण यामागे आहे, याचा तपास सांगवी पोलीस करत आहेत.