शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरासमोरच प्राणघातक हल्ला

By admin | Updated: July 5, 2017 02:52 IST

सातगाव पठार भागातील कारेगाव (ता. आंबेगाव) येथे विठ्ठल रुक्मीणी मंदीरासमोर सुनिल किसन घेवडे (वय ४८) यांच्यावर प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : सातगाव पठार भागातील कारेगाव (ता. आंबेगाव) येथे विठ्ठल रुक्मीणी मंदीरासमोर सुनिल किसन घेवडे (वय ४८) यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी घेवडे यांच्यावर चाकू व दगडाने हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. घोडके यांच्यावरील हल्ल्याचे कारण समजू शकले नाही. आरोपीतील एकाला ओळखण्यात पोलिसांना यश आले आहे. रात्री उशीरापर्यंत मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. कारेगाव येथील सुनिल घेवडे पेठ येथे कामानिमित्त आले होते. गावातील सेंट्रल बँकेसमोर शेजरी उभे असताना तिघेजण दुचाकीवरून तेथे आले. कारेगावला चला असे सांगून एक तरुण घेवडे यांच्या दुचाकीवर बसला. कारेगाव येथील विठ्ठल रुक्मीणी मंदिरासमोर घेवडे यांच्यावर चाकू व दगडाने त्या तिघांनी हल्ला केला. जखमी घेवडे यांना उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या हातावर व पायावर, पोटावर गंभीर जखमा असून त्यांना पुढील उपचासाठी पुणे यथे पाठविण्यात आले आहे. सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाल्याचेही सांगण्यात आले. मंचर पोलिस ठाण्यात रात्री ९ पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.