शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘एमपीएससी’तील रिक्त सदस्य कधी भरणार, ३१ जुलैची ‘डेडलाइन’ संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:10 IST

पुणे : राज्य सरकार ३१ जुलैपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (एमपीएससी) रिक्त सदस्य भरणार आहे, अशी घोषणा विधानसभेत करण्यात ...

पुणे : राज्य सरकार ३१ जुलैपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (एमपीएससी) रिक्त सदस्य भरणार आहे, अशी घोषणा विधानसभेत करण्यात आली होती. मात्र ३१ जुलै तारीख आली असताना देखील राज्य सरकार कडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली दिसून येत नाही. यावर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, विधिमंडळात केलेल्या घोषणेचा विसर पडलाय का? असा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. तसेच

पुन्हा कोणाला तरी आत्महत्या करावी लागणार का?, म्हणजे सरकारला जाग येईल. अशा प्रश्न उपस्थित केला आहे.

एमपीएससीची लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अजूनही हातात नियुक्तीपत्र मिळालेले नाही. दोन वर्षे पदे न भरल्याने स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद विधिमंडळात उमटले हाेते. यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी ३१ जुलैपर्यंत रिक्त सदस्य भरले जातील असे जाहीर केले होते. विधिमंळात केलेल्या घोषणेला कायदेशीर महत्व प्राप्त होते. दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उपमुख्यामंत्र्यांना या घोषणेचा विसर पडला आहे का ? असा संतप्त सवाल स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. कितीही आढावा बैठक घेतल्या किंवा संबंधित विभागाला आदेश देऊन काही होणार नाही. जोपर्यंत सरकार रिक्त सदस्य भरणार नाही. तोवर रखडलेल्या परीक्षा, मुलाखती वेगाने पार पडणार नाहीत. तसेच मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागला असताना सरकारने गांभीर्याने विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांचा विचार करण्याची गरज आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

कोरोनाचे कारण देत राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली होती. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. परंतू परीक्षा पुढे ढकलून आता सुमारे तीन ते चार महिने होत आले आहेत. आता तरी सरकारने तारीख जाहीर करावी, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांमध्ये आहे.

कोट

31 जुलैच्या पूर्वी विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी एमपीएससीच्या सर्व जागा भरल्या जातील असे आश्वासन दिले होते. नेहमीप्रमाणे ते हवेतच विरले. नोकर भरतीची अशी अनेक आश्वासने फक्त आश्वासने राहतात. म्हणजे एक आत्महत्या निर्णय घ्यायला अपुरी आहे तर स्वप्नीलने घेतलेला निर्णय अशाच धोरणकर्त्यांचा आणि धोरणाचा परिपाक होता. याला अपवाद महविकास आघाडी सरकार देखील आहे.

-नीलेश निंबाळकर, परीक्षार्थी.

शासनाने स्पर्धा परीक्षा च्या विदयार्थीना अंत्यत पध्दतशीर तोंडाला पाने पुसण्याचं काम केले आहे. वेळकाढू व चालढकलपणा करण्यात सत्ताधारी व विरोधक सारखेच. फक्त राजकारण कारायचं. विद्यार्थीच्या हिताचे त्यांना काही देणे घेणे नाही. अजून विद्यार्थ्यांनी अात्महत्या करावी. अशी अपेक्षा तर या सरकारची नाही ना? यांचा नाकर्तेपणा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणारा आहे.

- कुलदीप आंबेकर, अध्यक्ष स्टुडंट हेल्पींग हँड

अशा स्वरूपाच्या घटना घडल्यावर सरकार घोषणा करते. अशा गंभीर प्रश्नावर सरकार निर्णय घेत नाही. अशा दुसरी घटना घडण्याची वाट बघायची का ? अशा परीक्षा कोणी आयुष्यभर देत नसते. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचे वय वाढत आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांची, समाजाची भावना समजून घेतली पाहिजे.

निरंजन डावखरे, आमदार, विधान परिषद