शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रंगली शास्त्रीय संगीताची जुगलबंदी

By admin | Updated: January 22, 2016 00:53 IST

मानव संसाधन क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या व्हायब्रंट एचआर संघटनेचा वर्धापन दिन भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये विविध

पिंपरी : मानव संसाधन क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या व्हायब्रंट एचआर संघटनेचा वर्धापन दिन भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पुरस्कार वितरण, कामगार व व्यवस्थापनातील संबंधांचा ऊहापोह, शास्त्रीय संगीताची जुगलबंदी असे कार्यक्रम रंगले. आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेचे (आयएलओ) मुख्य तांत्रिक सल्लागार थॉमस क्रिंग, मराठा चेंबर आॅफ कॉमर्सचे महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख, कामगार उपायुक्त रत्नदीप हेंद्रे, सहायक कामगार आयुक्त संभाजी काकडे, सुनील बागल, आयएलओचे राष्ट्रीय प्रकल्प समन्वयक जी. एल. नरसी, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक, अ‍ॅड. श्रीनिवास इनामती, अ‍ॅड. राजीव जोशी, अ‍ॅड. आदित्य जोशी, प्राचार्य डॉ. विजय वधाई उपस्थित होते. पंडित अजय बक्षी व पंडित ऋषीकेश जगताप यांनी सतार व तबलावादनाची जुगलबंदी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संघटनेच्या वाटचालीचा आढावा शंकर साळुंखे व राम होनप यांनी घेतला. क्रिंग यांनी आयएलओ व व्हायब्रंट एचआर यांच्यामध्ये कामगारविषयक उपक्रमांसाठी करार करण्याची घोषणा केली. कुचिक यांनी ह्यएचआरह्ण हा कामगार व व्यवस्थापन यांच्यातील दुवा असल्याचे सांगितले. डॉ. सरदेशमुख यांनी सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. हेंद्रे व काकडे यांनी औद्योगिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी संघटनेचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद केले. व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून २२ जणांनी सुरू केलेल्या ग्रुपचे रूपांतर २३०० जणांच्या मोठ्या समूहात झाले आहे. ग्रुपचे विविध विभाग आहेत.सुधीर पाटील, शीतल साळुंके, अभिजित शेटे, सचिन गायकवाड, अमित केदारी, बंडू कुंभार, सविता गरुड, सोनाली घोडके, विशाल भांगे, विभावरी लोंढे, रविराज शिंदे, स्मिता नारकर, सुशांत खोत आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)