शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांत ‘डे’जचा माहौल

By admin | Updated: February 6, 2016 01:30 IST

फेब्रुवारी महिना आला की, महाविद्यालयांत उत्साहाचे वातावरण दिसू लागते. साधारणपणे या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महाविद्यालयात ‘डे’ज साजरे केले जातात

पिंपरी : फेब्रुवारी महिना आला की, महाविद्यालयांत उत्साहाचे वातावरण दिसू लागते. साधारणपणे या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महाविद्यालयात ‘डे’ज साजरे केले जातात. तरुण-तरुणींसाठी हा एक उत्सवच असतो. अगोदरच्या दिवशी कोणता दिवस साजरा करायचा याचे नियोजन केलेले असते. त्यानुसार तरुण-तरुणी विशिष्ट पेहराव करतात. काही पारंपरिक पेहरावाचे महाविद्यालयांत खास आकर्षण असते. त्यासाठी सध्या महाविद्यालयांतील तरुण-तरु णींची धावपळ सुरू असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. महविद्यालयांत मुलांनी आर्मी डे, साऊथ इंडियन ड्रेस, धोतर-कुर्ता, तर मुलींनी काश्मिरी, राजस्थानी डे, नऊवारी साडीचे अगोदरच बुकिंग करून ठेवले आहे. चॉकलेट डे, ब्लॅक डे, आॅड डे, घोस्ट डे, ट्रॅडिशनल डे, सारी-धोती डे, क्वीन्स डे, थीम डे, रोज डे आदी विविध डेज महाविद्यालयांत साजरे केले जात आहेत. डेज साजरे केले जात असले, तरी तरुणींतून ‘सारी डे’लाच जास्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या विविध महाविद्यालयांतून दिसून येत आहे. नऊवारी की, काठपदरी साडी यात काठपदरी साडी परिधान करण्यावरच तरुणींचा भर असल्याचे दिसून येते. तसेच वेगवेगळ्या फॅशनच्या साड्या घालण्याकडे कल आहे. तर तरुणांत मिस-मॅच डेबाबत अधिक उत्सुकता आहे. थीम डेची तयारी विद्यार्थ्यांत सुरू आहे. भुताचे पात्र, कार्टून, बिझनेस गेट अप, पर्यावरण अशा विविध थीम सादर केल्या जातात. टॅ्रडिशनल डेला कोण अस्सल गावठी पोशाखात येणार व कोण काय करणार याच्या प्लॅनिंगच्या गप्पा क ॉलेज कट्ट्यावर रंगत आहेत. डेजमध्ये सर्वच विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. (प्रतिनिधी)गटागटाने सेल्फी काढण्यावर तरुण-तरुणींचा अधिक भर असतो. एकाच वेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होता येत असल्याने तरुणांत सेल्फीची मोठी क्रेझ आहे. महाविद्यालयांत साजऱ्या होणाऱ्या डेला महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांबरोबर परदेशी विद्यार्थ्यांतही उत्सुकता असते. परदेशी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रीय संस्कृतीचे मोठे आकर्षण आहे. संस्कृतीनुसार पेहराव करण्यास विद्यार्थ्यांचा कल अधिक असतो. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसमवेत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारीही डेजमध्ये सहभाग नोंदवतात. - प्रा. संध्या लिगाडे, डी. वाय. पाटील. कॉलेज आॅफ अप्लाइड आटर््स अ‍ॅण्ड क्राफ्ट, आकुर्डीमहाविद्यालयात विद्यार्थी गटाने विविध डेज साजरे करतात. विद्यार्थ्यात चैतन्याचे वातावरण निर्माण होण्यासाठी डेज साजरे करण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून विद्यार्थी एकमेकांत मिसळतात. त्यातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो. नेतृत्वगुण विकसित होतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते. असे उपक्रम महाविद्यालयांत साजरे होण्याची आवश्यकता आहे. - डॉ. एस. एल. गायकवाड, शिक्षक