शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दौंडचे उपजिल्हा रुग्णालय असुरक्षित!

By admin | Updated: July 13, 2016 00:41 IST

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व तळीरामांचा परिसरातील वावरामुळे दौंड येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाल परिसराची सुरक्षा ऐरणीवर आली आहे

दौंड : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व तळीरामांचा परिसरातील वावरामुळे दौंड येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाल परिसराची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. नुकतीच येथे काही व्यक्तींनी एका डॉक्टराला शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा प्रकारही घडला आहे. त्यामुळे रात्र गस्तीची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. हे रुग्णालय शहराच्या निर्जन भागात आणि भीमा नदीपासून काही अंतरावर आहे. पथ दिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे सायंकाळ झाल्यावर येथे जाण्यासाठी रुग्ण घाबरतात. रुग्णालयाच्या बाजूलाच आरोग्य कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. शनिवार (दि. ९) रोजी काही व्यक्तींनी रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याचे कारण सांगत एका डॉक्टराला शिवीगाळ करून दमदाटी केली. सदर डॉक्टरने तुमचे रुग्ण आहेत का? असे विचारले, मात्र ते नसल्याचे समोर आले. तसेच काही महिन्यांपूर्वी एक मद्यपी गुन्हेगार रुग्णालयाच्या महिला प्रभागात गेला आणि तिथे रुग्ण महिलांचे फोटो काढत होता. त्याला कर्मचाऱ्यांनी बळजबरीने ओढून बाहेर काढले. तसेच रुग्णांच्या मनोरंजनासाठी सेवाभावी आणि समाजिक संस्थांनी दूरदर्शन संच भेट दिले आहे. परंतु काही गुन्हेगार रुग्णालयात घुसले आणि त्यांनी दूरदर्शन संच फोडल्याची घटनाही गेल्या वर्षी घडली असल्याचे समजते. उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय गुन्हेगारीला वैतागून काही कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. तर, काही कर्मचारी निघून गेले आहेत. परिणामी, आरोग्य सेवेच्या काही जागा रिक्त आहेत. मात्र, उदासीन धोरणामुळे रुग्णालयाला सुरक्षारक्षक नाही. (वार्ताहर)