लांडेवाडी-चिंचोडी ग्रामपंचायत एकूण १३ सदस्य आहेत. उपसरपंचपदी असलेल्या आशा शेवाळे यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व सदस्यांनी मिळून एकमुखाने दत्तात्रेय तळपे यांना पाठिंबा देत उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांचा सत्कार शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. गावच्या विकासासाठी मेहनत घेऊन गावपातळीवर लोकांच्या समस्या नेटाने मार्गी लावाव्यात, अशी अपेक्षा आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी सरपंच अंकुश लांडे, माजी उपसरपंच आशा शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष लांडे, भास्कर पाबळे, उत्तम गुंजाळ, मेजर तुकाराम शेवाळे, रूपा शेवाळे, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक भिकाजी बोकड आदी मान्यवर उपस्थित होते.
०७ मंचर तळपे
दत्तात्रय तळपे यांचा सत्कार करताना शिवाजीराव आढळराव पाटील व इतर.