शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डेटा चोरून मागितली खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:14 IST

व्यापाऱ्यात भीती : सायबर पोलिसांत तक्रार; मेलवरून संगणक हॅक

नारायणगाव : कॉम्प्युटरमधील डेटा अचानक गायब होतो़ नंतर स्क्रिनवर फक्त एकच मेसेज येतो़ ‘तुमचा सर्व डेटा आमच्याकडे आहे, तो सुरक्षित हवा असल्यास, आम्हाला बीटकॉईनमध्ये पेमेंट पाठवा़,’ अशा प्रकारे खंडणीची मागणी होत असल्याने व्यापारीवर्गात खळबळ माजली आहे़ दरम्यान, याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्याकडे एका व्यापाºयाने लेखी तक्रार केली आहे़ पोलीस ठाण्याकडून पुढील चौकशीसाठी सायबर क्राईमकडे सर्व माहिती पाठविण्यात आली आहे़

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील एक प्रा ़लि; कंपनी व एक होलसेल-रिटेल औषध विक्रेते अशा दोन प्रतिष्ठित व्यापाºयांचे कॉम्प्युटरमधील अकौंटचा संपूर्ण डेटा अचानक गायब झाला़

या डेटामध्ये १५ ते २० वर्षांपासूनची सर्व आर्थिक देणे-घेणेबाबत व्यवहाराची माहिती होती. कॉम्प्युटरवर काम चालू असताना अचानक स्क्रिन बंद होऊन सर्व माहिती हॅक झाली़ नंतर कोणतेही अकौंट दिसत नव्हते़ याचवेळी स्क्रिनवर मेसेज आला, ‘तुमचा सर्व डेटा आमच्याकडे आहे, तो सुरक्षित हवा असल्यास, आम्हाला बीट कॉईनमध्ये पेमेंट पाठवा,’ असा मेसेज आला़ या स्क्रिनवर कोणताही नंबर नाही, तर फक्त ईमेल अ‍ॅड्रेस दिलेला असून या ईमेल अ‍ॅड्रेसवर संपर्क साधण्याचा मेसेज होता़

या व्यापाºयांनी सॉफ्टवेअर कंपन्यांशी संपर्क साधला; परंतु त्यांना हॅक झालेला डेटा रिकर्व्हर करता आला नाही़ अनेक दिवस प्रयत्न करून त्यांनी बॅकअप घेतलेला चालू वर्षाचा डेटा उपलब्ध झाला, परंतु जुना डेटा उपलब्ध न झाल्याने या व्यापाºयांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे़ बीट कॉईनमध्ये किती व कशी रक्कम टाकावी, याबाबतचा उल्लेख केलेला नाही़एका बीट कॉईनची किंमत २ लाख ७९ हजार २६२ रुपये असल्याने या व्यापाºयांनी ईमेल अ‍ॅड्रेसवर संपर्क साधरण्याचे टाळले. ग्रामीण भागातही व्यापाºयांच्या कॉम्प्युटरचा डेटा हॅक करून खंडणी मागण्याचा प्रकार सुरू झाल्याने व्यापारीवर्गात खळबळ माजली आहे़ दरम्यान, डेटा हॅक झालेल्या औषधे विक्रेत्याने नारायणगाव पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे़ नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी या तक्रारीची दखल घेऊन पुढील चौकशीसाठी सायबर क्राईमकडे माहिती पाठविली आहे़

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम