शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरमधील सगळ््या रस्त्यांवर अंधार

By admin | Updated: February 2, 2017 03:42 IST

नगरपरिषदेकडे असणारी पाच कोटी रुपयांची महावितरण विभागाची थकबाकी भरण्यासाठी आठवडाभराची मुभा देवून देखील ती भरली गेली नसल्याने,आज( दि.१) दुपारी दोन वाजता

इंदापूर : नगरपरिषदेकडे असणारी पाच कोटी रुपयांची महावितरण विभागाची थकबाकी भरण्यासाठी आठवडाभराची मुभा देवून देखील ती भरली गेली नसल्याने,आज( दि.१) दुपारी दोन वाजता महावितरण विभागाने नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व स्ट्रीट लाईट व दोन्ही पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा तोडला आहे.थकबाकी असल्याने, १०० फूटी शंकरराव पाटील मार्ग, दूधगंगा रस्ता, व्यंकटेशनगर परिसर अशा शहरातील पाच ठिकाणच्या स्ट्रीट लाईटचा वीज पुरवठा महावितरणने तोडला होता.ती भरली नाही तर नाईलाजास्तव क्रमाक्रमाने इतर रस्त्यांवरील स्ट्रीट लाईट व पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा तोडण्यात येणार असल्याचे संकेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. इंदापूर नगरपरिषदेकडे पाणीपुरवठा विभागाकडील २ कोटी ३६ लाख १६ हजार ८६० रुपए तर स्ट्रीट लाईटचे २ कोटी ६७ लाख रुपये असे वीजबिल थकीत आहे.गेल्या दहा वषार्पासून महावितरण कंपनी ही थकबाकी भरावी,यासाठी नगरपरिषदेकडे पाठपुरावा करत आहे.तथापि आश्वासन व तुटपुंजी रक्कम भरुन नगरपरिषदेचे प्रशासन वीज पुरवठा सुरळीत ठेवत आहे. आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर शहरात भूमिगत स्ट्रीट लाईट करण्याचे २०० कोटीचे काम मंजुर झाल्याची घोषणा केली होती.सदर कामाच्या निविदा अद्याप निघाल्या नसल्याचे शेख यांनी स्पष्ट केले.मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांना विचारणा केली असता,त्यांनी सांगितले की, सन १९९६ -९७ पासून वीजबिल थकले आहे. १४ व्या वित्त आयोगातून निधी मिळवून बील भरण्याचा प्रयत्न करणार आहोत.२० वर्षांची थकबाकी नगराध्यक्षा उज्वला राऊत म्हणाल्या की, ही २० वर्षांची थकबाकी आहे. ती एकदम भरण्याची नगरपरिषदेची ऐपत नाही. नगरपरिषदेस वसुली शिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. वसुलीच्या प्रमाणात थकबाकी भरण्याची तरतूद करण्यात येईल. येत्या आठवड्यात तीन लाख रुपये भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.