शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दिराचा बलात्कार; नवऱ्याची मारहाण

By admin | Updated: April 25, 2016 02:41 IST

विवाहितेवर दिराने बलात्कार केला. याची तक्रार केली असता नवऱ्यानेही तिला जीवे मारण्याच्या हेतूने विवस्त्र करून मारहाण केली.

इंदापूर : विवाहितेवर दिराने बलात्कार केला. याची तक्रार केली असता नवऱ्यानेही तिला जीवे मारण्याच्या हेतूने विवस्त्र करून मारहाण केली. बेशुद्धावस्थेत रात्रभर रानात सोडून तो निघून गेला. तिच्या भावाने तिला शोधून काढले. आज (दि. २४) तिने दिराविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे ही घटना घडली. या प्रकारानंतर दीर फरारी झाला आहे. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, मारहाण करून डाळिंबाच्या रानात सोडून दिलेल्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याबाबत उलटसुलट चर्चा आहे. सविस्तर हकीकत अशी : शुक्रवारी (दि. २२) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दिर गायकवस्तीवर आपल्या भावाच्या घरी आला. भावजयीला स्वयंपाक करावयास सांगितले. तिच्या दोन्ही मुलांना दुकानातून खायला घेऊन या, म्हणून घराबाहेर पिटाळले. घराचा दरवाजा आतून बंद केला. पीडित भावजयीच्या तोंडात पदराचा बोळा कोंबून बलात्कार केला. या प्रकाराची बाहेर वाच्यता केली तर मुलीला पळवून नेईन. तिची इज्जत घेऊन, तिला मारून टाकीन, अशी धमकी देऊन तो तेथून निघून गेला.या प्रकारानंतर ती विवाहिता तक्रार देण्यासाठी इंदापूर पोलीस ठाण्याकडे निघाली असताना, पोलीस ठाण्याच्या अलीकडे बाबा चौकात आरोपीने तिला गाठले. धमकी देऊन माघारी पाठवले. काल (दि. २३) संध्याकाळी सात वाजता नवरा घरी आल्यानंतर घडलेल्या प्रसंगाबाबत ती त्याला सांगण्याचा प्रयत्न करीत असताना, काहीही ऐकून न घेता नवऱ्याने तिलाच बेदम मारहाण केली. अशी फिर्याद दिल्यामुळे इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार संजय नीलपत्रेवार तपास करीत आहेत. (वार्ताहर)