शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कचरा डेपो आल्यास मंदिराचे पावित्र्य धोक्यात

By admin | Updated: May 5, 2017 02:26 IST

पिंपरी सांडसला पुणे महानगरपालिकेचा कचरा डेपो होण्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याने व या परिसरात

कोरेगाव भीमा : पिंपरी सांडसला पुणे महानगरपालिकेचा कचरा डेपो होण्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याने व या परिसरात ऐतिहासिक बोल्हाईमाता मंदिर असल्याने नागरिकांनी आंदोलन छेडले होते; मात्र राज्य सरकारने ग्रामस्थांचा विरोध झुगारून पिंपरी सांडस (ता. हवेली) येथील वनखात्याची १९ हेक्टर जागा पुणे महानगरपालिकेच्या कचरा प्रकल्पासाठी देण्यास हिरवा कंदील दाखविल्याने पुण्याचा कचरा आता बोल्हाईमाता मंदिरापासून १ ते दीड किलोमीटर अंतरावर व ऐतिहासिक घाटशिळा मंदिराच्या प्रांगणात येणार आहे. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात येणार असल्याने ग्रामस्थ आता आक्रमक भूमिका घेणार आहेत.महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध देवस्थानापैकी श्रीक्षेत्र वाडेबोल्हाई येथे बोल्हाईमाता देवीचे जागृत देवस्थान आहे.मंदिराचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी या पंचक्रोशीतील सर्व गावांनी कचरा डेपोच्याविरोधात ग्रामसभेचे ठराव दिले आहेत. त्याचे एक निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आले आहे. खासदार शिवाजीराव आढळराव व आमदार बाबूराव पाचर्णे यांनी याआधीच या संभाव्य कचरा डेपोस विरोध केला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यकारिणीने ग्रामीण भागात होत असलेल्या कचरा डेपोस कडाडून विरोध केला आहे. सध्याचा पुणे शहरात साचलेला कचरा बोल्हाईमाता मंदिराच्या प्रांगणात टाकण्याचा डाव जर पुणे महानगरपालिकेने केला तर कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाड्या पेटवून देण्यात येतील, याची पुणे महानगरपालिकेने दखल घ्यावी.विकास झाला नाही तरी चालेल, पण कचरा नकोकचरा डेपो आमच्या परिसरात आल्याने या ठिकाणी फुरसुंगीप्रमाणे रोगराई वाढणार आहे. त्यामुळे कचरा डेपोस विरोध करताना गावचा विकास झाला नाही तरी चालेल, पण आम्ही कचरा डेपो होऊ देणार नसल्याचे सांगत वेळप्रसंगी तीव्र आंदोलन उभे करू, असे पिंपरी सांडसच्या सरपंच सुवर्णा गजरे यांनी सांगितले.कचरा डेपो होऊ देणार नाहीपुण्याचा कचरा पुण्यातच जिरवावा, अशी आमची भूमिका असून पिंपरी सांडसला कचरा डेपो करण्यास आमचा विरोध आहे. या ठिकाणी कचरा डेपो झाल्यास बोल्हाईमाता मंदिराचे पावित्र्य धोक्यात येणार असल्याने पुण्याचा कचरा डेपो कदापिही आमच्या भागात होऊ देणार नसून वेळप्रसंगी फुरसुंगी-उरुळीप्रमाणे आम्हीही आंदोलन उभारू.- बाबूराव पाचर्णे, आमदार मुख्यमंत्र्यांनी जनतेचा अंत पाहू नये बोल्हाईमाता मंदिराच्या पवित्र भूमीत पुण्याचा कचरा कदापिही होऊ देणार नाही. पिंपरी सांडसला कचरा डेपो होऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांना यापूर्वीच सांगितले असून सरकारने जनतेवर त्यांचे निर्णय लादू नये, असे सांगतानाच शासनाने जनतेचा अंत पाहू नये; अन्यथा जनतेला वेगळा मार्ग शोधावा लागेल, असे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले.- शिवाजीराव आढळराव, खासदारकचरा गाड्या पेटवून देणार पुणे शहराचा कचरा ऐतिहासिक बोल्हाईमाता मंदिराच्या प्रांगणात टाकण्याचा डाव पुणे महानगरपालिकेने केला, तर कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या कचरा गाड्या पेटवून दिल्या जातील.- संदीप भोंडवे, जिल्हा उपप्रमुख, शिवसेना