शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दांडेकर पुलावरील खूनाचे गूढ उकलले

By admin | Updated: April 22, 2015 05:40 IST

हरवलेल्या चुलत्याचा पत्ता सांगत नाही, म्हणून एकाला दारू पाजून गळ्यावर आणि पोटात वार करून त्याचा मृतदेह कालव्यात टाकून देण्यात आला होता

पुणे : हरवलेल्या चुलत्याचा पत्ता सांगत नाही, म्हणून एकाला दारू पाजून गळ्यावर आणि पोटात वार करून त्याचा मृतदेह कालव्यात टाकून देण्यात आला होता. गेल्या आठवड्यात दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना स्वारगेट पोलिसांनी उघडकीस आणली. खुनाचे गूढ उकलत पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी दिली.सूरज नंदू उत्तेकर (वय २१, रा. १३०, दांडेकर पुल), किरण बापू मिसाळ (वय १३३, आंबिल ओढ़ा कॉलनी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या दोघांनी संभाजी दादाराम ओहाळ (वय ४२, रा. लातूर) यांचा खून केला होता. आरोपींना २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. वरिष्ठ निरीक्षक निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओहाळ हे मुळचे लातूरचे होते. त्यांची बहिण सिंहगड रस्त्यावर राहण्यास आहे तर भाऊ दांडेकर पुलावर राहतो. ओहाळ सध्या या दोघांकडे येऊन जाऊन राहत होते. आरोपी सूरज याचा चुलता हरवलेला आहे. त्याचा पत्ता ओहाळ यांना माहिती होता असे त्यांनी आरोपींना सांगितले होते. परंतु, ते पत्ता सांगत नव्हते. त्यामुळे आरोपींनी त्यांना १० एप्रिल रोजी रात्री दारू प्यायला सोबत नेले. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कालव्याशेजारी दारूपित बसलेले होते. त्यावेळी सूरज याने पुन्हा चुलत्याचा पत्ता विचारला. परंतु ओहाळ यांनी पत्ता सांगण्यास नकार दिला. त्यावेळी चिडलेल्या आरोपींनी ओहाळ यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यानंतर बियरची बाटली फोडून काचेने पोटात भोसकले. खून केल्यानंतर त्याचे कपडे काढून मृतदेह कालव्यात फेकून दिला होता.